पुणे

सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के काढणार

CD

चाकण, ता.१८ : खेड तालुक्यातील पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर गेल्या चाळीस वर्षांपासून चासकमान व भामा आसखेड धरणाचे पाणी मिळत नसताना शासनाचे शिक्के होते. ते काढण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे काळूस येथील शेतकरी सुभाष पवळे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी गजानन गांडेकर यांनी दिली.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्के काढण्याचा निर्णय घेण्यात आला.काळूस (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी ढोल-तासे वाजवून आनंद व्यक्त केला व राज्य सरकारचे व माजी मंत्री खोत यांचे आभार मानले.
खेड तालुक्यातील काळुस, रासे, भोसे, मरकळ व चाकण परिसरातील गावात ज्यांच्या शेतीला भामाआसखेड, चासकमान धरणाचे पाणी मिळत नाही. परंतु लाभक्षेत्र म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर पुनर्वसनाचे शिक्के अनेक वर्षापासून टाकण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीला धरणाचे पाणी मिळत नसल्याने प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळत नसला तरीही काही शेतकऱ्यांच्या जमिनी धरणग्रस्तांसाठी पुनर्वसनासाठी घेतल्या आहेत. शासनाने व काही अधिकारी, एजंट लोकांनी पुनर्वसनासाठी जमिनी घ्यायच्या ही शेतकऱ्यावर बळजबरी केली आहे. शेतकऱ्यांना जमिनीही कमी आहेत. त्यात जमिनी पुनर्वसनासाठी घेतल्या गेल्याने शेतकरी उद्‌धवस्त झाला आहे. भूमिहीन झाला आहे. शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील शिक्के काढण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन, उपोषण आदी मार्गाचा अवलंब केला. माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली उपोषण, आंदोलन केले होते. माजी मंत्री खोत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय झाला.एवढे दिवस घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले याचा आनंद झाल्याने काळूस या गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामदैवत काळेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर वाजत, गाजत वाजंत्री वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून एकमेकांना पेढे भरवून मोठ्या उत्साहाने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शेतकरी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

05522

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video

CRPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! 25,487 जागांसाठी भरती सुरू, 31 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

SCROLL FOR NEXT