पुणे

कडाचीवाडीत मारहाणप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल

CD

चाकण, ता. २६ : कडाचीवाडी (ता. खेड) येथील बापदेव वस्तीवर एका आरोपीने मोटार लावण्यासाठी खंडणी मागितली. ती खंडणी देण्यास फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करून फिर्यादीला व त्याच्या मित्राला जबर मारहाण केली. फिर्यादीच्या घरासमोरील दुसऱ्या गाड्यांचेही नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महेश बबन कड (वय ३२, रा. कडाचीवाडी, बापदेवस्ती) याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद कड याने त्याची मोटार मंदिरासमोर लावली. त्यावेळी आरोपीने गाडी लावण्याचे महिन्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने मोटार लावली म्हणून मोटारीचे नुकसान केले. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीचा मित्र भूषण खांडेभराड यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपीने जमलेल्या लोकांना मोठ्याने ओरडून हातातील लाकडी दांडके भिरकावून परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादीच्या घरासमोरील दुसऱ्या चारचाकी कारचेही लाकडी दांडक्याने मारून नुकसान केले. फिर्यादीचा लहान भाऊ सुनील कड यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपीचे वडील बबन कड व महेश कड यांनाही भूषण खांडेभराड (रा. कडाचीवाडी), आनंद कड या दोघांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या दोघांविरोधातही तक्रार दाखल कोली आहे. बबन कड व त्यांची सून भांडण सोडविण्यासाठी गेले त्यावेळेस दोघांनी बबन कड व त्यांच्या सुनेला शिवीगाळ करून त्यांना ढकलून दिले व लाकडी दांडक्याने मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील नागरिकांना कर्करोगाबाबत दर्जेदार उपचार मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय

Latest Marathi News Live Update: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सांगली जिल्ह्यातील वेजेगांवच्या तरूणाला ७ वर्षे सक्तमजुरी

Pargaon News : अमेरिकेत स्थायिक असलेल्या आंबेगावची कन्या माधुरी पवार -वळसे पाटील हिने राज्यातील पूरग्रस्तांच्यासाठी पाठवली एक लाख रुपयांची मदत

Hadapsar News : निवृत्त कलाशिक्षकाने सुपारीवर साकारली दुर्गेची नऊ रूपे

CA Jobs Abroad: CA साठी केवळ भारताच नाही, परदेशातही आहे प्रचंड संधी! या देशांमध्ये सहज मिळू शकते नोकरी

SCROLL FOR NEXT