पुणे

चाकण बाह्यवळण तातडीने पूर्ण करा

CD

चाकण, ता. १ : चाकण (ता. खेड) परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. अपघातांची मालिका सुरूच असून, त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून चाकणचा प्रस्तावित बाह्यवळण मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर, सदस्य संभाजी मेदनकर, गणेश भुजबळ, अमितबापू मेदनकर यांनी पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी यांची आकुर्डी (पुणे) येथील कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी त्यांनी बाह्यवळण मार्गाच्या सद्यःस्थितीची माहिती घेतली. यावर उत्तर देताना अधीक्षक अभियंता बागडी व कनिष्ठ अभियंता जितेंद्र पगार यांनी सांगितले की, ‘‘या मार्गासाठी सुमारे १६९ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यामध्ये भूसंपादन व मार्गनिर्मितीचा समावेश आहे. सुमारे साडेबावीस एकर जमिनीचे भूसंपादन अपेक्षित असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.’’
भूसंपादनासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रभावित शेतकरी व जमिनी मालकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी २०२६ पासून प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. भूसंपादनासाठी लागणारा निधी पीएमआरडीएकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडेही मागणी सादर केली आहे. तसेच भूसंपादन प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर आणि सदस्यांनी सांगितले.

पन्नास टक्के कोंडी कमी होणार
या बाह्यवळण मार्गामुळे चाकणमधील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी होणार आहे. पुणे- नाशिक महामार्ग आणि चाकण-शिक्रापूर मार्गाला जोडणारा हा मार्ग सुमारे अडीच किलोमीटर लांब व ३६ मीटर रुंद आहे. हा मार्ग मेदनकरवाडी, कडाचीवाडी परिसरातून जाणार असल्याने मोठ्या वाहनांचा ओघ या मार्गावर वळवता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT