पुणे

क्रेनच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार जखमी

CD

चाकण, ता. ३० : येथील पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकाच्या पुढे वाघे वस्तीजवळ पाठीमागून येणाऱ्या क्रेनने मंगळवारी (ता. २८) दुपारी पुढील दुचाकीला जोरात ठोकर दिली आणि काही अंतरावर दुचाकीस्वारास ओढत नेले. या अपघातात अतुल भोंडवे (वय ३९, रा. सांगवडे, ता. मावळ) असे गंभीर जखमी झाला आहे.
अतुल त्याच्यावर पिंपरी-चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनचालकाने क्रेन हयगयीने बेदरकारपणे चालवली व पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली व दुचाकी चालकाला दुचाकीसहीत काही अंतर ओढत नेले. यामुळे भोंडवे गंभीर जखमी झाला तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी आजूबाजूचे लोक गोळा झाले त्यांनी क्रेन थांबवली. पोलिसांनी याप्रकरणी क्रेन (क्रमांक एम एच १४ सीए -९९३६) च्या चालकावर जखमी फिर्यादी भोंडवे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ''हा निव्वळ अपघात...''

Amazon Layoffs : अमेझॉनकडून मोठा निर्णय; आणखी १६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

IND vs NZ, 4th T20I: इशान किशन संघातून बाहेर, सूर्यकुमारने सांगितलं कारण; कोणाला मिळाली प्लेइंग-११ मध्ये संधी?

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

Latest Marathi News Live Update : धुरंदर नेता हरपल्याचे पुण्यात बॅनर

SCROLL FOR NEXT