चाकण, ता. ५ : ‘‘खेड तालुक्यातील चाकणचे माजी उपनगराध्यक्ष व उद्योजक राजेंद्र गोरे यांनी त्यांच्या मातोश्री स्व. शांताबाई दत्तात्रेय गोरे यांच्या स्मरणार्थ चाकण येथे पुणे- नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ ‘हेल्थसिटी प्रगत आरोग्य सेवा’ हे अत्याधुनिक सेवासुविधायुक्त असे हॉस्पिटल सुरू केले आहे. या परिसरासाठी हा उल्लेखनीय उपक्रम आहे. या हॉस्पिटलमधून रुग्णांना योग्य सेवा माफक दरात मिळेल,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
‘हेल्थसिटी प्रगत आरोग्य सेवा’ या हॉस्पिटलचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात एक अत्याधुनिक सेवा सुविधा देणारे तज्ज्ञ डॉक्टर असलेले हे हॉस्पिटल आहे. याचा लाभ या परिसरातील रुग्णांना, अपघातग्रस्तांना नक्की होईल. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना योग्य असे वातावरण आहे. या ठिकाणी रुग्ण आल्यानंतर येथील वातावरण स्थिती पाहिल्यानंतर रुग्ण अर्धा बरा झाला पाहिजे, अशा पद्धतीने डॉक्टरांनी काम केलं पाहिजे.’’
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार रामभाऊ कांडगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, मनीषा गोरे, खेड बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, दत्तात्रेय भेगडे, ध्रुवशेठ कानपिळे, डॉ. अमितकुमार गौड, डॉ. योगेश डुकरे, अशोक भुजबळ, चंदन पानसरे, मंगल गोरे, चेतन कडूसकर, राजेश भुजबळ, विजयसिंह गायकवाड, किशोर शेवकरी, संतोष वाघ, प्रवीण गोरे, प्रकाश वाडेकर, प्रकाश गोरे, महेश शेवकरी, बिपिन रासकर, सुहास गोरे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत उद्योजक राजेंद्र गोरे व राजेश कांडगे यांनी केले.
CHN25B09669
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.