पुणे

चाकण रस्त्याच्या रुंदीकरणाला झाडांचा अडथळा

CD

चाकण, ता. १२ : येथील माणिक चौकाजवळ चाकण- शिक्रापूर मार्गावर तळेगाव चौकापासून ५०० मीटर अंतर रस्त्याचे एकेरी मार्गाचे रुंदीकरण होत आहे. सध्या एका बाजूने रुंदीकरणाचे काम सुरू झालेले आहे. मात्र, या रुंदीकरणाच्या आत मोठी झाडे व काही ठिकाणी विद्युत रोहित्र येत आहेत. त्यामुळे रुंदीकरण मार्गाला अडथळा निर्माण होत आहे.
चाकण (ता. खेड) येथील माणिक चौक ते चाकण- शिक्रापूर रस्त्यावरील ओढ्यापर्यंत सुमारे पाचशे मीटर अंतरापर्यंत चाकण शिक्रापूर मार्गाचे दोन्ही बाजूने रुंदीकरण होणार आहे. सध्या एकाच चाकण बाजूकडे येणाऱ्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या मार्गात मोठी झाडे आहेत. मोठी झाडे न काढल्यामुळे रुंदीकरण न होता मार्ग प्रत्यक्षात अरुंद होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी पुन्हा होणार आहे. रुंदीकरण करताना झाडे व इतर अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे.
चाकण- शिक्रापूर, चाकण- तळेगाव हा मार्ग सध्या एमएसआयडीसीच्या ताब्यात आहे. झाडे काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. एमएसआयडीसी परवानगी घेऊन झाडे काढणार आहे. दोन्ही बाजूने मार्गाचे रुंदीकरण होऊन डांबरीकरण होणार आहे. चाकण- तळेगाव मार्गावर काही लोक रुंदीकरणाला विरोध करत आहेत. त्यामुळे तेथील काम रेंगाळले आहे.
- दिलीप शिंदे, उपअभियंता, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

09688

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update: स्थायी समिती कोणाकडे? आज होणार यादी जाहीर

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT