पुणे

वाटाणा, वांगी, भेंडीचे भाव कडाडले

CD

चाकण, ता.२३ : फळभाज्या व भाजीपाला पावसाने सडल्याने बाजारात फळभाज्या व भाजीपाल्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे. मागणी वाढल्याने फळभाज्या तसेच पालेभाज्यांचे बाजारभाव कडाडले आहेत. त्यामुळे चाकण (ता. खेड) येथील बाजारात रविवारी (ता. २३) गवार, हिरवा वाटाणा, वालाच्या शेंगा, वांगी, भेंडी आदींचे भाव किरकोळ बाजारात प्रतिकिलोला अगदी दीडशे, दोनशे रुपये आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला, फळभाज्या खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे.


चाकणमधील महात्मा फुले बाजार आवारात रविवारी मध्यप्रदेशातून सुमारे तीस टनांवर हिरव्या वाटाण्याची आवक झाली. गुजरात तसेच नागपुरातून हिरव्या काळी मिरचीची व हिरव्या पिवळ्या मिरचीची मिळून सुमारे पन्नास टन आवक झाली. इंदोर बटाट्याला प्रतिकिलोला बावीस रुपये बाजारभाव मिळाला. आग्रा व गुजरात राज्यातूनही बटाट्याची आवक झाली. कांद्याची सुमारे दीड हजार क्विंटल आवक झाली.त्यास प्रतिकिलोला १२ ते २२ रुपये बाजारभाव मिळाला.
नाशिक, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातून टोमॅटोची सुमारे पन्नास टन आवक झाली. त्याच्या भावात प्रतिकिलोला दहा रुपयांनी वाढ झाली. कांद्याची सुमारे दीड हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला आठ ते चौदा रुपये भाव मिळाला. पावसाळी नवा कांदा बाजारात या महिन्यात येण्याची शक्यता आहे. पावसाळी कांद्याचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव पुढीलप्रमाणे (रुपयांत) : टोमॅटो :३०-४०, कारली :६०-७०, दोडका :६०, भेंडी : ८०, गवार : १२०, कोबी : २४, फ्लॉवर : ३०, वांगी : ७०, हिरवी मिरची : ३५, दुधी भोपळा : ५०, शेवगा : ८०-१२, ढोबळी मिरची : ४०-७०, चवळी : ५०-६०, हिरवा वाटाणा : १००, काकडी : ३०, गाजर : ३०-४०, आले : ४०ते ५०, वालवर : ५०- ७०.

मेथीची जुडी २० रुपये
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकच्या सुमारे एक लाख वर जुड्यांची आवक झाली. मेथीच्या एका जुडीला २० रुपये बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीच्या एका जुडीला १० ते १२ रुपये बाजारभाव मिळाला. शेपूच्या एका जुडीला २० रुपये बाजारभाव मिळाला. पालकच्या एका जुडीला १२ रुपये बाजारभाव मिळाला.


09751

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर 11 वाजता अंत्यसंस्कार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

अजितदादांनी ऐकलं नाही! रात्रीच कारने बारामतीला जाऊया म्हणालो होतो; चालक श्यामराव मनवेंना अश्रू अनावर

Ajit Pawar : लोकनेता गमावला; विविध मान्यवर नेत्यांकडून श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT