पुणे

रोपांसह बियाण्यांच्या किमती भिडल्या गगनाला

CD

चाकण, ता.१४ : चाकण व परिसरात रब्बी हंगामातील कांद्याच्या लागवडीला वेग आला आहे. कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. खेड तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सुमारे पाच हजार हेक्टरवर आहे. यंदा कांद्याची रोपे तसेच बियाणे महागले आहे. तसेच पावसाने रोपांचे मोठे नुकसान झाल्याने कांद्याची लागवड उशिरा होत आहे.

पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे रोपांसह बियाण्यांच्या किमती खूपच महागल्या आहेत. बियाण्याचे तीन हजार ते पाच हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव गेले. ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील पावसामुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली तसेच मोठ्या प्रमाणात उगवलेली रोपे सडून गेली. त्यामुळे कांद्याच्या रोपांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासू लागला. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या वेळेस रोपे टाकली त्यांचे नुकसान झाले. परत पुन्हा रोपे टाकली त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिसऱ्यांदा रोपे टाकली त्यानंतर रोपे लागवडीला आली आहेत. सध्या फक्त ४० टक्के लागवडी झाल्या आहेत.

डिसेंबर अखेरपर्यंतही लागवडीचे प्रमाण कमीच राहणार आहे. कांद्याची रोपे साधारणपणे दीड महिन्यात लागवडीसाठी येतात. त्यानंतर रोपांची लागवड केल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यात कांदा काढणीस येतो.

दुबई, सिंगापूरला चाकणच्या कांद्याची पसंती
खेड तालुक्यात गरवा जातीस प्राधान्य जाते. हा कांदा फिक्कट लाल, उग्र वास असलेला, साठवणुकीसाठी योग्य, निर्यातक्षम तसेच अधिक उत्पादन देणारा असतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यात या कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या निर्यातक्षम योग्य कांद्याची निर्यात चाकण बाजारातून दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, सौदी अरेबिया या देशात होते.


दरवर्षी गरवाजातीच्या कांद्याचे उत्पादन घेतो. यावर्षी पावसामुळे कांद्याची लागवड ही दोन महिने उशिरा पुढे ढकललेली आहे. त्यामुळे हा कांदा मार्च महिन्यात काढणीस येईल. या कांद्याला मागणी मोठी असते. रोपांच्या व बियाण्यांच्या वाढलेल्या किमती तसेच मजुरीचा वाढलेला खर्च, खत, औषधे, मशागतीचा खर्च यामुळे कांदा लागवड ही मोठी खर्चिक झाली आहे.
- विशाल पऱ्हाड, कांदा उत्पादक


09882

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Wild Animal : अवघ्या ७ वर्षीय राजवीरचा बळी गेला, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याबाबत काय केलं; सर्किट बेंचकडून राज्य सरकारला विचारणा

Amravati Crime: खून करून कालव्यात जाळला मृतदेह; जहानपूर येथील घटना ,वाहनाच्या टायरचे निशाण

BJP Party : पक्षविरोधी कारवाया केलेले रडारवर! भाजपची भूमिका; पराभूत उमेदवारांकडून वैयक्तिक अहवाल पक्षश्रेष्ठींनी मागवला

Nashik News : दररोज ८ शेतकऱ्यांचा मृत्यू! भीषण वास्तव रोखण्यासाठी कृषी आयुक्तांकडून 'टास्क फोर्स'ची घोषणा

"लग्नाला 38 वर्षं पूर्ण पण अजूनही आई-वडिलांनी स्वीकारलं नाही !" मैंने प्यार किया फेम अभिनेत्रीची खंत

SCROLL FOR NEXT