पुणे

आश्रमशाळेतील जेवण सुमार दर्जाचे

CD

चास, ता. ८ : टोकावडे (ता. खेड) येथील शासकीय आश्रमशाळेत मुलांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा अतिशय सुमार आहे. वेळोवेळी आवाज उठवूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. रविवारी (ता. ७) भाजीत चक्क अळ्या तरंगताना दिसून आल्या. दिलेला भात कच्चा की शिजवलेला? हा प्रश्न पडत असून चपाती कच्ची व कडक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ प्रकल्प विभाग उघड्या डोळ्याने बघत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
खेड तालुक्यातील टोकावडे, कोहिंडे व चिखलगाव या तीन आश्रमशाळा घोडेगाव प्रकल्प कार्यालयांतर्गत आहे. या आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शाळेअंतर्गत किचनची व्यवस्था होती. मात्र या जेवणाच्या दर्जाबाबत व साठवणूक केलेल्या धान्य व भाजीपाल्याबाबत नेहमी तक्रारी होत असल्याने तसेच विद्यार्थ्यांना पोषक व परिपूर्ण आहार मिळावा या दृष्टीने मागील वर्षापासून सेंट्रल किचन संकल्पना उदयाला आली. या माध्यमातून या आश्रमशाळेतील व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचा व परिपूर्ण पोषण देणारा अन्नपुरवठा सेंट्रल किचनच्या माध्यमातून आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली करण्यास सुरूवात झाली. मात्र त्यातही भ्रष्टाचार होत असेल तर या मुलांनी दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
याबाबत घोडेगाव प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

आलेल्या अन्नाची सर्वप्रथम आम्ही पाहणी करत असतो. मात्र रविवारी आमच्याकडे आलेल्या सोयाबीनच्या भाजीत अळ्या दिसून आल्याने आम्ही मुलांना जेवणात ही भाजी न देता वरण, भात, चपाती तसेच राजगिरा लाडू, बिस्कीट दिले.
- प्रमोद चोखांदरे, अधीक्षक, टोकावडे आश्रमशाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT