पुणे

खेड तालुक्यात खरिपाच्या ६७ टक्के पेरण्या

CD

चास, ता. २ : ऑगस्ट महिना सुरू झाला तरी खेड तालुक्यात खरीप हंगामात फक्त ६७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झालेल्या पिकांची स्थितीही समाधानकारक नसल्याचे चित्र आहे, सर्वाधीक उत्पादन असणाऱ्या पिकामध्ये भाताची ८८.६९ टक्के क्षेत्रावर तर सोयाबीनची ७६.०९ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

एकंदर स्थिती असून एकूण खरीप हंगामाचे क्षेत्र ५१९८३.०९ हेक्टर असून सरासरी पेरण्या ३५०८५.१५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून त्याचे प्रमाण ६७.४९ टक्के असल्याचे खेड तालुका कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.


पावासाच्या लहरीपणाला आता शेतकरी वैतागला आहे. चालू वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना ना पेरणीपूर्व मशागतींना वेळ मिळाला ना भात पिकाच्या रोपांसाठी भाजणीला. मुसळधार पावसामुळे शेतीची कामे रखडली, पाण्याचा निचरा न झाल्याने खरीप हंगाम हातचा गेला अशा स्थितीत असताना पावसाने उघडीप दिल्याने उपलब्ध क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पिके येतील या आशेवर पेरण्या करण्यास तसेच भात पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. गेली काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पारंपरिक असणाऱ्या भुईमूग, बाजरी, बटाटा, कडधान्य पिके यांच्याकडे शेतकरी दुर्लभ करत आहे. दिवसेंदिवस सोयाबीन पिकाकडे जास्त ओढा दिसून येतो आहे. चालू वर्षी पिकांच्या पेरण्याच रखडल्याने सद्यःस्थितीत खरीप अहवाल कृषी विभागाकडून प्राप्त झाला आहे.

खरीप हंगामातील पिकाचे सरासरी क्षेत्र तर कंसात हेक्टरी पेरणी झालेले क्षेत्र व टक्केवारी हेक्टरी -
पीक..........सरासरी क्षेत्र.........हेक्टरी पेरणी............टक्केवारी
भात....... ७७५०.०२..........६८७३.३०..........८८.६९
ज्वारी..........३२.०८..........०...........०
बाजरी..........६३१.०६..........०...........०
मका..........३३०३..........२६६३.००..........८०.६२
तूर..........११९.०४..........७.७०..........०६.४५
मुग..........१९३.०१..........१४.१०..........०७.३०
उडीद..........१०९.०८..........०४.००..........०३.६४
भुईमूग..........१६५०..........३३५.७०..........२०.३५
तीळ..........० ..........०...........००
सोयाबीन..........१८९६०..........१४४२६.००..........७६.०९
कांदा..........९ ..........०...........०
बटाटा..........४५००..........७६२.००..........१६.९३
टोमॅटो..........५७८ ..........१०५.५०..........१८.२५
चारापिके.........४६७१.........४२२०,००.........९०.३४ टक्के

03673

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ''आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत'', जरांगे पाटलांचं दसरा मेळाव्यात मोठं विधान

Nashik News : समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव! मुक्त विद्यापीठातर्फे बाबूराव बागूल व रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

Ravana Descendants : आजही भारतात राहतात रावणाचे वंशज, साजरा करत नाहीत दसरा, विजयादशमीला करतात रावणाची पूजा..

R Ashwin युएईच्या T20 लीगमध्ये अनसोल्ड राहण्यामागं वेगळंच कारण? सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या...

Mehbooba Mufti : राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहिल्याने पंधरा जण ताब्यात; कारवाईबाबत मेहबुबा मुफ्ती यांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT