पुणे

वाडा येथे बैलपोळ्याच्या खरेदीसाठी गर्दी

CD

चास, ता.२० : वाडा (ता. खेड) परिसरात भाद्रपदी बैलपोळ्याच्या खरेदीसाठी मातीच्या बैलांसह प्लॅष्टर ऑफ पॅरिसच्या बैलांच्या प्रतिकृतींना मागणी वाढली आहे. बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वाडा गावच्या आठवडे बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
बाजारात बैलांची विविध रुपांमध्ये व आकारांमध्ये बैलजोड्यांची विक्री करण्यात आली. सुमारे तीस रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत बैलांच्या किंमती होत्या. मात्र, मागील वर्षापेक्षा जवळपास पंचवीस टक्के किमती वाढल्याचे सांगण्यात आले.
सध्याच्या यांत्रिकी युगात व महागाईच्या तडाख्याबरोबरच शेतीमालाच्या ढासळणाऱ्या किंमतीमुळे बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे. बैलपोळा व मातीच्या बैलांच्या पूजेचे महत्त्व लक्षात घेता गिऱ्हाईकांच्या मागणीनुसार मातीच्या घोड्यांचीही त्याचबरोबर आकर्षक व नक्षीदार असणारी शिंगे, तसेच नक्षीदार लेस, झालर, घुंगरे, घंटी अशा स्वरूपात सजवलेल्या बैलांची असणारी मागणी लक्षात घेता या प्रकारची बैले बनविण्यास कारागिरांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते. शनिवार हा वाडा गावचा आठवडे बाजार असल्याने बैलपोळ्याच्या सहित्याच्या खरेदीबरोबरच आठवडे बाजारातून अन्य वस्तुंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तुंची दुकाने आठवडे बाजारात शेतकऱ्यांना आकर्षित करत होती.

03832

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul price cut News : ‘अमूल’ने घेतला मोठा निर्णय! तब्बल ७०० पेक्षा अधिक उत्पादनांच्या किंमतीत केली घट

Dandiya Function : कोल्हापुरात नवरात्रोत्सवात रास दांडिया खेळण्यासाठी जय्यत तयारी, विविध ठिकाणी होणार कार्यक्रम; इथे उत्साह वाढवा

Motala Crime : धावत्या ट्रॅव्हल्समध्ये विवाहितेचा विनयभंग; पुण्यावरून येताना घडली घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Smriti Mandhana: स्मृती मानधनाने मोडला Virat Kohli चा मोठा विक्रम! भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंनाही नाही जमला असा पराक्रम केला

Latest Marathi News Live Update : माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT