पुणे

खेडच्या पश्चिम पट्ट्यात बैलपोळ्याला वेगळे स्वरूप

CD

चास, ता. २१ ः खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तसेच वाडा परिसरात भाद्रपदी बैलपोळा आनंदी वातावरणात हलगी, डफड्याच्या तालावर साजरा करण्यात आला. थांबलेला पाऊस, जोमदार पिके व वातावरणातील उत्साह यांमुळे बैलपोळ्याचा जल्लोष दिसून आला. मात्र, काही गावात बैलांच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर नृत्यांगणांचे नृत्य सादर झाल्याने सणाला वेगळे स्वरूप प्राप्त झालेले दिसले.
यावर्षी पाऊस दमदार बरसला असून तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील परिसरात खरिप हंगामातील पिके चांगली आली आहेत. समाधानकारक पिके असल्याने शेतकरी आनंदी असून ज्या बैलांच्या जीवावर शेती पिकलेली आहे त्या बैलांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य बाजारपेठ असणाऱ्या वाडा गावात बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या नक्षीदार लेस, झालर, घुंगरमाळा, घंटी, फुगे, रंग यांसह अन्य वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. बैलपोळ्याच्या दिवशी झूली घालून गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत, शिंगांना रंग व फुगे बांधुन वाडा गावातून बैलांच्या भव्य मिरवणुका पारंपारिक वाद्यांच्या तालावर काढल्या गेल्या. बळीराजा या मिरवणुकीत बेफाम होऊन नाचला. मात्र, डिजेच्या जमान्यात काही अतिउत्साहींनी मिरवणुकीत नृत्यांगणांचे नृत्य सादर केल्याने हा चर्चेचा विषय झाला. अनेकांनी अशा स्वरूपाच्या मिरवणुकीवर नाराजी व्यक्त करीत हे आपल्या संस्कृतीच्या विपरीत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानची दमछाक! साहिबजादा फरहानचे आक्रमण, पण शिवम दुबेने दिला ब्रेकथ्रू

Pune Fraud : ‘रॉ’च्या मिशनचे आमिष दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याला चार कोटींचा गंडा; धक्कादायक प्रकार उघड, चार वर्षांत कोट्यवधींचा व्यवहार

IND vs PAK: पाकिस्तानी फलंदाजानं आयसीसीचा मोठा नियम मोडला, कारवाई होणार? सामन्यात नेमकं काय घडलं?

GST Reform : देशातील जनता 'गब्बर सिंग टॅक्स' कधीही विसरणार नाही; मल्लिकार्जून खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Viral: एआयची कमाल! महिलेने ChatGPT वापरून $150,000 ची लॉटरी जिंकली, पण कशी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT