पुणे

खरिपातील ४२४.०७ हेक्टरचे नुकसान

CD

राजेंद्र लोथे ः सकाळ वृत्तसेवा
चास, ता. ४ ः खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे सुमारे ४२४.०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून चार कोटी ८९ लाख ७२ हजार ७५ रुपयांची मदत मिळणार आहे. संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी सांगितले. खेड तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. खेड तालुक्यात खरीप हंगामातील पिकाचे सरासरी क्षेत्र ५० हजार ७०२ हेक्टर असून, प्रत्यक्षात ४८ हजार ५४६.२५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या व लागवडी झाल्या होत्या. यापैकी अतिवृष्टीमुळे ४२४.०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकमुखाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.
खरीप हंगाम सुरू झाल्यावर जवळपास दीड महिना पडत असलेल्या पावसामुळे शेतीची कामे करता आली नसल्याचे चित्र होते. सततच्या पावसाने शेतांमध्ये वापसा नसल्याने शेतांमध्ये पाणी साचून राहून दलदल तयार झाली होती.
जिरायती क्षेत्रामध्ये एकूण ३० गावांमधील ४७८ शेतकरी बाधित झाले असून, यामध्ये सोयाबीन २१६.६१ हेक्टर, भात ११ हेक्टर, भुईमूग ११ हेक्टर, बाजरी १.४५ हेक्टर, राजमा ०.३० हेक्टर, ज्वारी ०.२० हेक्टर व इतर पिकांचे ३२.२ हेक्टर असे २७२.७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण बाधित जिराईत पिकास मदतीचे दर ८५०० रुपये हेक्टरप्रमाणे दोन कोटी १८ लाख ८४ हजार ६० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
बागायती क्षेत्रामध्ये एकूण २३ गावांमधील ३४५ शेतकरी बाधित झाले आहेत. यामध्ये कांदा ९९.०४ हेक्टर, बटाटा १६.८० हेक्टर, भाजीपाला २४.३८ हेक्टर, मका ४.०६ हेक्टर क्षेत्र क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण बाधित बागायत पिकास मदतीचे दर १७ हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन कोटी ५५ लाख २० हजार ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.


फळबागांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत
फळबाग पिकांमध्ये एकूण दोन गावांमधील चार शेतकरी बाधित झालेले असून, यामध्ये चिकू ०.४२ हेक्टर, पेरू ०.३७ हेक्टर, लिंबू ०.४० हेक्टर असून, एकूण बाधित फळबाग पिकास मदतीचे दर २२ हजार ५०० रुपये हेक्टरप्रमाणे २६ लाख ७७५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

खेड तालुक्यात एकूण ५५ गावांमधील सुमारे ४२४.०७ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. या गावांमधील एकूण ८२७ शेतकरी बाधित झालेले आहेत. या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे ४ कोटी ८९ लाख ७ हजार २७५ रुपयांचे वाटप होणार असून, संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे सुरू असून, त्याची माहिती लवकरच प्राप्त होईल.
- वैभव विश्वे, तालुका कृषी अधिकारी

मंडलानुसार बाधित क्षेत्र
मंडल बाधित क्षेत्र हे.
खेड - ३३५.२९
वाडा - ३७.८०
पाईट -१५.१६
चाकण -३५.८२

04008

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Latest Marathi Live Update News : भायखळा दरम्यान काही महिला पडून अपघात

Eknath Shinde : चाकणला उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; लाडकी बहिण योजना बंद होणार नाही!

Earn Lakhs Without Job : नोकरी न करताही तुम्ही मिळवू शकता लाखोंचं पॅकेज!, फक्त पास करा एक परीक्षा

SCROLL FOR NEXT