राजेंद्र लोथे : सकाळ वृत्तसेवा
चास, ता.१६ : बुरसेवाडी (ता. खेड) येथे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती खेड अंतर्गत पशुचिकित्सालय आहे. मात्र तिच्या दुरुस्तीची गरज आहे. इमारतीचा रंग उडून गेलेला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. दत्तात्रेय तोडमल कार्यरत आहेत.
डॅा. तोडमल व त्यांचे पथक जनावरांवर व्यवस्थित उपचार करत करतात. शिवाय वेळेवर येथे डॅाक्टर व कर्मचारीवर्ग उपलब्ध राहून पशुपालकांना चांगल्या प्रकारे सेवा देत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी, एक सहाय्यक कार्यरत असून परिचारक पद रिक्त आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत येथील चिकित्सालयाची स्थिती चांगली आहे.
जनावरांचे २३४ कृत्रिम रेतन
एचएलएक्स..... २१३
गिर व खिलार..... १९
मुऱ्हा..... २
दृष्टिक्षेपात दवाखाना
- औषधसाठा उपलब्ध असून तात्कालिक मदत
- वंधत्वबाबत वेगवेगळ्या शिबिरात पशुपालकांना माहिती
- फिरती दौरे, पशुपालकांना डेअरी व्यवस्थापन अंतर्गत मार्गदर्शन
- डेअरीच्या माध्यमातून पशुपालकांना ब्रीडिंगविषयक प्रशिक्षण
- गोचिड निर्मूलन माहितीही देण्यात येते.
- पशुधनावर केले जातात वेळेवर उपचार
एप्रिलपासूनची स्थिती
बछड्यांचे जन्म दर........४० ते ४५ टक्के
गर्भ तपासणी.......५१६
लसीकरण
लाळ्या-खुरकूत (एफएमडी).............१७००
एचएस).............५००
बीक्यु).............५०
एलएसडी).............१४००
ब्रुसेलोसिस).............८००,
एफ.पीओएक्स).............२००
एमएआरएएक्स).............२००
पीपीआर /ईटी (मेंढी-शेळींसाठी).............६००
चारा व वैरण विकास
- मुबलक प्रमाणात चराऊ राने उपलब्ध
- ६९ पशुपालकांना बियाण्यांचे वितरण केले जाते
- हरित व सुक्या चाऱ्याचा पुरवठा-दर उपलब्धता
- संपूर्ण वर्षभर हिरवा चारा व सुका चारा उपलब्ध असतो.
प्रमुख राज्य / केंद्र पुरस्कृत योजना
गोशाळा सहाय्यता योजना अंतर्गत कान्हेवाडी येथील गोशाळेत साधारण २०० जनावरे असून ५० रुपयांप्रमाणे प्रत्येक जनावरांना दररोज दिले जातात. एनएलएम लाभार्थी नसून राष्ट्रीय पशुधन मोहीम अंतर्गत योजनेखालील एकूण लाभार्थी संख्या दोन असून ५० हजार ते ५७ हजार प्रतिलाभार्थी देण्यात येतात.
पशुपालकांना प्रशिक्षण तालुका स्तरावर देण्यात येत असून, नवीन तंत्रज्ञान चालू वर्षापासून लागू करण्यात आलेले आहे. शेतकरी स्वतः ऑनलाइन अर्ज करत असून कृत्रिम रेतन, गर्भतपासणी, लसीकरण, एफएमडी ऑनलाइन अॅपवर करण्यात येत असल्याचे दिसून आले. एकंदरीत कामाचा आढावा घेतला असता समाधानकारक स्थिती असून वेळेवर डॅाक्टर उपलब्ध असतात.
04038