पुणे

मिरजेवाडेतील जाधव कुटुंबाला मदतीचा हात

CD

चास, ता. १४ : वीजवाहक तार अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या मिरजेवाडी (ता. खेड) येथील किसन जाधव यांच्या परिवाराला पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे तसेच बहिरवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच वसुधा राक्षे यांच्या वतीने ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. अंकुश राक्षे यांच्यावतीने संबंधित परिवाराला ५० हजारांचा धनादेश परिवाराच्या घरी जाऊन सुपूर्त करण्यात आला.
किसन जाधव हे मिरजेवाडीच्या ठाकरवाडी येथील मोलमजुरी करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होते. २२ ऑक्टोबरला एका शेतकऱ्याच्या शेतात मोलमजुरी करत असताना त्यांच्या अंगावर वीजवाहक तार पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुरेखा जाधव व मुलगा रूपेश जाधव असे कुटुंब आहे. कुटुंबाची गरज ओळखून ही आर्थिक मदत देण्यात आली.
अंकुश राक्षे म्हणाले, ‘‘किसन जाधव हे मिरजेवाडी ठाकरवाडीतील असून मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवीत होते. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत व किसन जाधव यांचा मृत्यूही त्याचाच एक भाग आहे. पुन्हा एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. परिवारातील मुलगा रूपेश जाधव यांना महावितरणने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत करावी तसेच नोकरी मिळवून द्यावी. तहसीलदारांनी देखील यामध्ये लक्ष घालून परिवारास न्याय मिळवून द्यावा,’’ अशी मागणीही त्यांनी केली.


04043

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results: बिहारच्या विजयाचा MY फॉर्म्युला नेमका काय? मोदींनी सांगितलं विजयाचं गणित

Pune Navale Bridge Accident-Public Outrage Video : मयतीला चला... ! म्हणत, सततच्या अपघातांमुळे संतापलेल्या पुणेकरांनी नवले पुलावरून थेट तिरडीच काढली

ए वाण्या तू गप्प बस... वर्षा उसगावकर यांनी सांगितला अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो किस्सा; म्हणाल्या, 'ते दोघे नेहमी...'

Bihar Election Result 2025 Live Updates : समस्तीपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पूल परिसर महामार्ग ‘डेथ झोन’! पाच वर्षांत अपघातांची मालिका सुरूच

SCROLL FOR NEXT