पुणे

कडधेमध्ये खंडोबा देवाच्या दर्शनास गर्दी

CD

चास, ता. १ : कडधे (ता. खेड) येथील कुलदैवत खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांनी खंडोबाचा जयघोष करत खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करीत कुलदैवतेचे दर्शन घेतले. देवाबरोबर बानाई मातेचा विवाह सोहळ्याचा आनंद भाविकांनी घेतल्याची माहिती देवस्थानचे विश्‍वस्त शंकरराव देवदरे यांनी दिली.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कडधे येथील खंडेरायाचे देवस्थान असून दरवर्षी येथे माघ पौर्णिमेस उत्सव साजरा होतो. सकाळी देवाची महापूजा, अभिषेक विश्‍वस्त शंकरराव देवदरे, सरपंच जयमाला कदम यांच्या वतीने करण्यात आला. यात्रेच्या मुख्य कार्यक्रमात सकाळी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या माध्यमातून देवाचा मुखवटा गावातील सर्व मंदिरातून टाळ, मृदंग, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने नेऊन देवभेट तसेच हार तुरे पालखीतून आणून देवाला अर्पण करण्यात आले. पालखी सोहळा देवाच्या मंदिरात विसावल्यावर भाविकांच्या साक्षीने खंडोबा देव तसेच बानाई देवीचा विवाह सोहळा पार पडला.
उपस्थितांनी अक्षतांची उधळण करत सदानंदाचा येळकोटचा जयघोष केला. मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात खोबरे आणि भंडाराच्या दुकानांबरोबरच हॅाटेल, खेळण्यांच्या दुकानाबरोबर पाळणे यामुळे मंदिर आणि परिसर भाविकांनी फुलला होता. खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब नाईकडे, विश्‍वस्त शंकरराव देवदरे, शांताराम नाईकडे, ज्ञानेश्‍वर गुरव, जिजाभाऊ नाईकडे, अशोक सुतार, बाळासाहेब मिरजे, माजी आदर्श सरपंच प्रियांका देवदरे, आशा नाईकडे, सहिंद्रा देवदरे, विमल हुले, अॅड. अमृता गुरव-देशमुख, रंगनाथ महाराज नाईकडे, उपसरपंच सचिन नाईकडे, केतन चव्हाण, सोपान मिरजे, शांताराम नाईकडे यांसह ग्रामस्थांनी भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी व्यवस्था केली होती. यात्रेला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उत्साह द्विगुणित केला. यात्रेचे संपूर्ण नियोजन ग्रामस्थ कडधे, खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मुंबईकर, पुणेकर, गावातील सर्व युवक मंडळे, महिला मंडळांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT