पुणे

वनविभागाला बिबट्यांसोबतच्या संघर्षाचे आवाहन

CD

खोडद : जुन्नर तालुक्यात होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे हतबल झालेल्या वनविभागासमोर आता तुटपुंज्या यंत्रणेसह बिबट्यांचा सामना करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अल्प मनुष्यबळ आणि अपुरी सामग्री यामुळे बिबट्यांच्या समस्या सोडविताना वनविभागाला नाकीनऊ येत आहे.

बिबट्यांची वाढती संख्या, बिबट्यांचे पशुधनावरील आणि मानवी हल्ले यामुळे सध्या जुन्नर वनविभागातील काही गावे हॉटस्पॉट ठरली आहेत. बिबट्यांचा जुन्नर तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या जुन्नरमध्ये आता बिबट्या अधिकच आक्रमक झाला असून बिबट्यांकडून मानवी हल्ले देखील वाढले आहेत. बिबट्यांची संख्या आणि बिबट्यांकडून होणारे हल्ले नियंत्रणात आणताना वन विभागाची दमछाक होताना दिसत आहे.

डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थान या संस्थेकडून जुन्नर वनविभागाच्या (जुन्नर, आंबेगाव खेड व शिरूर तालुका) हद्दीत केलेल्या सर्वेक्षणानुसार या क्षेत्रात बिबट्यांच्या संख्येची घनता प्रति १०० चौरस किलो मीटरमध्ये ७ बिबटे इतकी आढळून आली आहे. या परिसरात बिबट्यांचे हल्ल्यांचे प्रमाण पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांमध्ये ४०० ते ४५० बिबटे असण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे.

सध्या जुन्नर वनविभागात २ सहायक वनसंरक्षक, ७ वनपरिक्षेत्र अधिकारी, ३४ वनपाल, ९६ वनरक्षक, २ वाहनचालक, ६५ वनमजूर असे एकूण २०६ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ हे वाढलेला मानव-बिबट संघर्ष हाताळण्यासाठी वनविभागाला कमी पडत आहे.

या परिसरात सततच्या बिबट हल्ल्यांमुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तरतूद करून अधिक साहित्य सामग्री तातडीने उपलब्ध होण्यासाठी वनविभाग पाठपुरावा करत आहे. सध्या जुन्नर वनविभागाकडे बिबटे पकडण्यासाठी १५० पिंजरे उपलब्ध असून हे पिंजरे कमी पडत असून आणखी १५० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे.

वनविभागाकडे अपुरी असलेली सामग्री -
रेस्क्यू वाहने - २
•बिबटे पकडण्याचे पिंजरे - १५०
•आपदा मित्र - ५०
•तात्पुरते मनुष्यबळ (तीन महिन्यांसाठी)- १००


जुन्नर वन विभागाने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यात केलेल्या उपाययोजना
•मार्च २०२२ - स्थानिक युवकांची एकूण ७ जनजागृती तथा बचाव पथके. या पथकांत २५३ सदस्य कार्यरत आहेत.
•ऑक्टोबर २०२२ - बिबट्यांचा अतीवावर असलेल्या संवेदनशील गावात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठ्यासाठी वीज महावितरणला प्रस्ताव.
•नोव्हेंबर २०२३ - शिरूर, आंबेगाव, जुन्नरच्या पूर्व भागात ४० गावांसाठी सातत्याने जनजागृती करणाऱ्या पथकाची पिंपरखेड येथे स्थापना. या पथकात ११ कार्यरत आहेत.
•जानेवारी २०२४ - बिबट संख्या नियंत्रणासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे नसबंदीचा प्रस्ताव सादर.
•मार्च २०२४ - जुन्नर तालुक्यातील ८० गावांसाठी सातत्याने जनजागृती करणाऱ्या पथकाची नगदवाडी येथे स्थापना करण्यात आली असून यात ११ सदस्य कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Fake Farmer Card: सिल्लोडमध्ये बनावट ‘फार्मर कार्ड’; योजनेच्या नावाखाली केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

Satara Crime: 'दहिवडीनजीक एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला'; जखमीवर उपचार सुरू, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

Doha ISSF World Cup 2025: नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र; दोहा येथे डिसेंबरदरम्यान रंगणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT