पुणे

खोडदच्या महात्मा फुले विद्यालयात इन्ट्रॅक्टिव बोर्ड

CD

खोडद, ता.२० : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन प्रगत शिक्षण घेता यावे यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संस्थेच्या सहकार्यातून ६५ इंचांचे दोन इन्ट्रॅक्टिव बोर्ड विद्यालयात कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती खोडद (ता.जुन्नर) येथील महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा दळवी यांनी दिली.
या इन्ट्रॅक्टिव बोर्डमुळे विद्यार्थ्यांना अत्यंत सहज व सोप्या पद्धतीने अध्ययनासाठी फायदा होणार आहे. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी हे इन्ट्रॅक्टिव बोर्ड वापरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाद्‍वारे स्पर्धात्मक युगात उपयोग होण्यासाठी संस्था व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला आहे. खोडद गावातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा दळवी व सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Playing XI: अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित, जाणून घ्या कोण IN, कोण OUT

Organic Food: सेंद्रिय अन्नातून खरोखरच न्यूट्रिशन मिळतं का? तज्ज्ञांचे आश्चर्यकारक दावे

AI in Health Sector : डॉक्टरने लिहिलेले औषधांचे प्रिस्क्रिप्शन AI वाचू शकते का? यातून उलगडले एक मोठे रहस्य..

Latest Marathi News Live Update : गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस, अविनाश देशमुख यांची घोषणा

Sony Marathi : नवरात्रोत्सवात सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - बोनस जिंका’ स्पर्धा!

SCROLL FOR NEXT