पुणे

हिवरेतर्फे नारायणगावात शुक्रवारी बैलगाडा शर्यती

CD

खोडद, ता.२१ : हिवरेतर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे सोमवार (ता.२२) नवरात्रीनिमित्त मुक्ताई देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे. यामुळे धार्मिक कार्यक्रम व बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. नऊ दिवस दररोज पहाटे व सायंकाळी देवीची आरती व भजन असे कार्यक्रम पार पडणार आहेत.
नवरात्रोत्सवानिमित्त शुक्रवार (ता. ३) ते रविवार (ता.५) या तीन दिवसांत हिवरे येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांना या शर्यतीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तीन दिवसांत ४५० बैलगाडे या शर्यतीत सहभाग घेतील असे अपेक्षित आहे.
बैलगाडा शर्यतींसाठी रोख स्वरूपात आणि वस्तुस्वरुपात मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या नंबरसाठी एक लाख रुपये, दुसऱ्या नंबरसाठी ७१ हजार रुपये, तिसऱ्या नंबरसाठी ४१ हजार रुपये, पहिल्या फळीफोडसाठी १५ हजार रुपये, दुसऱ्या फळीफोडसाठी १० हजार रुपये, तिसऱ्या फळीफोडसाठी ७ हजार ५०० रुपये, पहिल्या क्रमांकात फायनल येणाऱ्या गाड्यासाठी तीन मोटारसायकली, दुसऱ्या क्रमांकात फायनल येणाऱ्या गाड्यासाठी तीन वॉशिंग मशिन, तिसऱ्या क्रमांकात फायनल येणाऱ्या गाड्यासाठी ३ फ्रिज, चौथ्या क्रमांकात येणाऱ्या फायनलसाठी ३ एलसीडी टीव्ही, पाचव्या क्रमांकात येणाऱ्या फायनलसाठी ३ वॉटरफिल्टर, सहाव्या क्रमांकात येणाऱ्या फायनलसाठी ३ बॅटरी पंप, सातव्या क्रमांकात येणाऱ्या फायनलसाठी ३ टेबल फॅन, आकर्षक ठरणाऱ्या बैलगाड्यास एक सायकल, घाटाच्या राजासाठी ३ ट्रॉफी, तीन दिवसांत सर्वात आतून येणाऱ्या बैलगाड्यास मोटारसायकल व घाटाचा महाराजा किताब अशी मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.


01591

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

Upper farmer:'उपरीतील शेतकऱ्यांचा बंधाऱ्यावरुन जीवघेणा प्रवास'; कासाळ ओढ्यावर पुलाची मागणी

Kunbi Note: 'साेलापूर जिल्ह्यात कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण'; गाव, आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्र

Palghar Crime: 'बोईसर तारापूर खून प्रकरणातील दोघे आरोपींना अटक'; पोलिसांनी आरोपींना राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरातमधून घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Update : गुरुकुलामध्ये ऐतिहासिक सामूहिक महालय श्राद्ध सोहळा पार पडला

SCROLL FOR NEXT