खोडद, ता. २५ : हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून मिळालेल्या इंटरऍक्टिव्ह बोर्डचे बँक व्यवस्थापक अजय दानवे तर ‘एज्यु सेल्फी पॉईंट’ चे उद्घाटन राजेंद्र रणदिवे यांनी केले.
यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर खोकराळे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण शिंदे, सन्मित्र पतसंस्थेचे उपाध्यक्ष आदिनाथ बारवे, सलीम तांबोळी, मोसीन इनामदार, बाळासाहेब थोरात, शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष आरती भोर, सदस्य योजना निलख, सन्मित्र वाचनालयाचे अध्यक्ष रामदास शिंदे आदी उपस्थित होते.