पुणे

रंगीबेरंगी पाहुण्यांनी मीना तीराचे सौंदर्य खुलले

CD

खोडद, ता. २५ : हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे मीना नदीकाठच्या परिसरात ८ ते १० चित्रबलकांचे वास्तव्य आहे. येथील चिंचेच्या मोठ्या झाडांच्या शेंड्यावर या चित्रबलकांची वसाहत आहे. आपल्या सौंदर्याने चित्रबलाक लक्ष वेधून घेत आहे. मागील काही वर्षांपासून येथे चित्रबलाकांचे वास्तव्य पाहायला मिळत आहे.
चित्रबलाक हा आकाराने गिधाडापेक्षा मोठा असतो. हा चित्रबलाक, रंगीत करकोचा, चंदनेश्वर, चामढोक या नावांनी ओळखले जाते तर संस्कृतमध्ये काष्ठसारंग बक म्हणून ओळखला जातो. चोच मोठी, लांब व  पिवळी असते. संपूर्ण अंगावर पांढरी पिसे असतात. या पंखांवर चमकदार हिरवट काळ्या रंगाच्या खुणा असतात. छातीवर आडवा काळा पट्टा असतो. खांद्याजवळची व पंखावरची गुलाबी पिसे या चित्रबलाकचे  वैशिष्ट्य आहे. हा पक्षी चित्रासारखा सुंदर दिसतो म्हणून याला चित्रबलाक म्हणतात. चित्रबलाक पक्ष्यांचा विणीचा हंगाम जुलै ते ऑक्टोबरमध्ये असतो. पिल्लांना ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून दुपारच्या वेळी चित्रबलक दोन्ही पंख पसरून पिल्लांवर सावली धरतात. नदीत जाऊन पाणी चोचीत घेऊन येतात व घरट्यातील पिल्लांवर पाणी सोडतात, अशा प्रकारे हे चित्रबलाक पक्षी आपल्या पिल्लांची काळजी घेतात. हा पक्षी पिल्लांना चोचीने भरवत नाही. मासे, बेडूक, इतर खाद्य गोळा करून जठराच्या वरच्या भागात असलेल्या अन्न संचयात साठवून ठेवतो व घरट्याकडे येतो. लाळेनं माखलेले खाद्य घरट्यात उलटी करतो, ते अन्न पिल्ले अतिशय आनंदात खातात.

उंची अडीच फुटांपर्यंत
चित्रबलाक उभा राहिल्यानंतर उंची अडीच फुटांपर्यंत असते. पंख पसरवल्यावर रुंदी तीन फुटांपर्यंत भरते. डोकं केशरी किंवा लालसर रंगाचे आणि शेपटी राणी किंवा गुलाबी रंगाच्या पिसांनी आच्छादलेली असते. पंख अर्धे काळे आणि अर्धे पांढरे असे मिश्रण दिसते, पाय पिवळसर केशरी असतात. पंखांच्या काळ्या भागावर पांढऱ्या आडव्या रेषा अगदी ठळक दिसतात. यांना मुळात समूहाने राहण्याची सवय असल्याने खूप सारे पक्षी एखादे उंच झाड पाहून त्यावर काटक्यांनी आपले घरटे बनवतात.मादी साधारणपणे २ ते ५ अंडी घालते. अंडी उबवण्यासाठी महिन्याभराचा कालावधी जातो. या मधल्या काळात कवळ्यांपासून अंड्यांचे रक्षण यांना करावे लागत.

शिकारीसाठी घरट्यांपासून जातात ४० किमी दूर
चित्रबलाक शिकारीसाठी उथळ पाण्यात तासन्‌तास समाधी लावून बसतात. यावेळी बहुधा चोच पाण्यात बुडालेल्या स्थितीत असते. लपून बसलेल्या माशांना बाहेर काढण्यासाठी पायाने तो पाणी गढूळ करतो. निसर्गाने यांच्या चोचीला विशिष्ट अशा संवेदना दिल्या आहेत. माशाचा हलका स्पर्श देखील या चोचीला पटकन समजतो आणि तो लगेच चोचीने मासा पकडतो. शिकारासाठी चित्रबलाक घरट्यांपासून ४० किलोमीटर दूर जातात. चित्रबलाक हे खूप शांत पक्षी आहेत, यांचा आवाज क्षीण असून अगदीच कधीतरी ऐकायला मिळतो.

वाढते प्रदूषण, चोरटी वृक्षतोड, उत्खननामुळे जैवविविधता, पर्यावरण व निसर्गात अनेक बदल होत आहेत. वेळीच योग्य व ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून येथील पशू-पक्षी, सूक्ष्मजीव, निसर्ग व जैवविविधता चिरकाल टिकून राहील.
-विजय वायाळ, पक्षी व निसर्ग अभ्यासक, जुन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT