पुणे

पारगाव तर्फे आळेत सलग दुसरा बिबट्या जेरबंद

CD

खोडद, ता. १७ : पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील रामवाडीत वनविभागाने बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास आणखी एक बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट मादी जातीचा असून तीन ते चार वर्षे वयाचा आहे. या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. या परिसरात आणखीही बिबटे असावेत, अशी शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
पारगाव तर्फे आळे येथील रामवाडी येथील शेतकरी श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणी सुरू असताना बाजूला खेळत असलेल्या रोहित बाबूराव कापरे या ८ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी (ता.१५) सकाळी घडली होती. यानंतर वनविभागाने तातडीने या ठिकाणी १५ पिंजरे आणि दहा ट्रॅप कॅमेरे लावले होते. येथे लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (ता. १६) रात्री आठच्या सुमारास एक सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला होता. हा बिबट्या ज्या ठिकाणी अडकला गेला त्या पिंजऱ्याच्या थोड्या दूर अंतरावरच लावलेल्या पिंजऱ्यात अवघ्या काही तासांत जेरबंद झालेला हा सलग दुसरा बिबट्या आहे. बुधवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी सकाळी पिंजऱ्यात बिबट्या अडकला का नाही हे पाहण्यासाठी गेले असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले.वनविभागाचे अनेक कर्मचारी येथे मागील दोन दिवसांपासून सातत्याने नजर ठेवून आहेत. जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.जुन्नरच्या साहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, चैतन्य कांबळे, वनपाल नीलम ढोबळे, गणेश बागडे, वनरक्षक विशाल गुंड, स्वप्नील केदारी, विश्वराज सोळुंके, महेश जाधव, कैलास भालेराव, ज्ञानेश्वर साळुंखे आणि रेस्क्यू टीम मधील सदस्य या परिसरात बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

सध्या बिबट्या दिसल्यानंतर अनेक नागरिक बिबट्याच्या मागे जाऊन मोबाइलमध्ये बिबट्याचे व्हिडिओ काढून ते समाज माध्यमावर टाकत आहेत. शक्यतो बिबट्यांचे व्हिडिओ काढण्याचे टाळावे, कारण बिबट्या माघारी फिरू शकतो.बिबट्याचे व्हिडिओ काढणे हे जिवावर बेतू शकते.
- स्मिता राजहंस, साहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर


1819

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजनाचा ऑनलाईन आढावा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT