दौंड : दौंड बाजार समितीच्या केडगाव येथील उपबाजारात कांद्याची आवक वाढली. दरात प्रतिक्विंटल पाचशे रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. कांद्याची १,१८५ क्विंटल आवक झाली. प्रतवारीनुसार किमान ८०० रुपये ; तर कमाल ७००० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची १,०१० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रतवारीनुसार किमान ८०० रुपये; तर कमाल ६,५०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, यवत व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहेत. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली. लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने सध्या बाजारभाव तेजीत आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १३,१९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल १,२०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ६,८९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १,३०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
केडगाव येथे लिंबाची ११६ डाग आवक झाली. प्रतवारीनुसार किमान २०१ व कमाल ४६१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे. थंडीमुळे लिंबाला मागणी कमी होती. मागील आठवड्यात लिंबाची ६८ डाग आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ४०० व कमाल ६०१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला होता.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ४४३ २२०० ३५१०
ज्वारी १३५ २१०० ३४००
बाजरी ५१५ २१५० ३५००
हरभरा ०१८ ५३०० ६३००
मका २२२ १७५० २२४०
उडीद ०२५ ५००० ६१००
मूग ००८ ५००० ७१००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा - ३००, आले - ५००, गाजर - ५००, पेरू - १५०, काकडी - २५०, भोपळा - २००, कोबी - २५०, फ्लॅावर - ३५०, टोमॅटो - ४१०, हिरवी मिरची - ४००, भेंडी - ५८०, कार्ली - ४५०, दोडका - ५००, वांगी - ५५०, शिमला मिरची - ४००, घेवडा - ५५०, गवार - १२२०, लिंबू - ४००.
टोमॅटो व हिरवी मिरचीच्या दरात वाढ
टोमॅटो व हिरवी मिरचीची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. तालुक्यात टोमॅटोची १६० क्विंटल आवक झाली असून प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ४१० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ६१ क्विंटल आवक झाली. प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ४०० रुपये असा दर मिळाला.
बटाटे, काकडी व वांग्याच्या दरात घट
बटाट्याची २४३ क्विंटल आवक झाली असून प्रति दहा किलोसाठी किमान २४० तर कमाल ३०० रुपये असा दर मिळाला. काकडीची ७३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १००
तर कमाल २५० रुपये, असा दर मिळाला. तर वांगीची ५२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ५५० रुपये, असा दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.