पुणे

दौंड बाजारात बाजरीच्या भावात वाढ

CD

दौंड, ता. २६ : दौंड तालुक्यात बाजरीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीची एकूण २०६ क्विंटल आवक असून त्यास प्रतवारीनुसार किमान २२०० तर कमाल ३३०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव तेजीत आहेत. केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभावात तेजी आहे. केडगाल उपबाजारात चवळीची दहा क्विंटल आवक होऊन किमान ८००० तर कमाल १०५०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. केडगाव येथे कांद्याची आवक घटली असून एकूण ६४०२ क्विंटल आवक होऊन कांद्यास प्रतवारीनुसार किमान ३०० तर कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १४९३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ०३०० तर कमाल १००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची १०६० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल २१०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपुची १४८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल २२०० रुपये असा बाजारभाव मिळाला.


शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ४२२ २३०० ३०५०
ज्वारी ०७५ २२०० ३५००
बाजरी २०६ २२०० ३३००
हरभरा ०१८ ४३०० ५३८०
मका ०६३ १८०० २२३०
मूग ००३ ५८०० ६२००
तूर ०२१ ५५०० ६२००


दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२००, आले-३००, गाजर-२५०, पेरू-२००, काकडी-३२०, भोपळा-२००, कोबी-२००, फ्लॅावर- ३००, टोमॅटो-२५०, हिरवी मिरची - २५०, भेंडी - ६५०, कार्ली -७००, दोडका - ९५०, डाळिंब - ६०, मका कणीस - २०.

भाजीपाल्याची तेजीत
दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभावात तेजी आहे. टोमॅटोची १७८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २५० रुपये, असा दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Lift Accident: १२ वर्षांचा पोटचा गोळा गेला, आई पोरकी झाली... पिंपरीत मुलगा लिफ्टमध्ये कसा अडकला? काय घडलं होतं?

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Latest Marathi News Live Update : ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

100 Years Of RSS: रेशीम बागेत चैतन्य अन्‌ उत्साह; संघ शताब्दी विजयादशमीला हजारो स्वयंसेवकांची गर्दी

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजाने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड! आता 'हिटमॅन'चा विक्रम संकटात; ध्रुव जुरेलसह शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT