पुणे

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी फुलारी

CD

दौंड, ता. ६ : दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. पोपट जगन्नाथ फुलारी २५ मतांच्या फरकाने विजयी झाले, तर उपाध्यक्षपदी ॲड. अजहरुद्दीन बाबा मुलाणी यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकीत २७७ पैकी २४१ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदाचे उमेदवार पोपट फुलारी १०६ मते घेऊन विजयी झाले, तर पराभूत उमेदवार अमोल काळे यांना ८१, संतोष चव्हाण यांना ४३ व अनिल फडके यांना आठ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. अजित दोरगे यांनी काम पाहिले. सन २०२५-२६ या कालावधीसाठी असोसिएशनची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सचिव- सागर हनुमंत शेळके, सहसचिव- गणेश अभिमन्यू कांबळे, खजिनदार-ज्योती प्रकाश नाईक, हिशोबनीस- सचिन महादेव शिंदे, ग्रंथपाल- विजय रामचंद्र काकडे, सदस्य- सारिका बापूराव अहिवळे, ओंकार राजेंद्र बारोडे, उषा नंदू मगर, अविनाश सुदाम पिंगळे.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT