दौंड, ता. २४ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक वाढली झाली असून बाजारभावात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची १०० क्विंटल आवक झाली असून त्यास किमान २२०० तर कमाल ४२०० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव व यवत येथील उपबाजारात भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे. पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून एकूण क्विंटल ६३७२ आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० तर कमाल १७०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. केडगाव येथे पेरूची ११५ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २० ते २७ रुपये, असा भाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ८७५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ६११ २३०० ३०१०
ज्वारी १०० २२०० ४२००
बाजरी ४३३ १९०० ३२००
हरभरा ०३३ ४४०० ५७००
मका ०४५ १९०० २४००
उडीद ०७९ ४८०० ६२००
तूर ००८ ५००० ५५५०
मूग १४६ ६००० ८३१०
बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल बाजारभाव) : बटाटा-१८०, आले-३००, गाजर-३००, पेरू-२००, काकडी-२००, भोपळा-१२०, कोबी-८०, फ्लॅावर-२००, टोमॅटो-१२५, हिरवी मिरची-५००, भेंडी-४१०, कार्ली-३००, दोडका-४५०, वांगी-३५०, शिमला मिरची - ४००, गवार-९००, घेवडा-३००, बिट-२००, डाळिंब-६००.
काकडी, भोपळा व दोडक्याच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात काकडीची १०८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल २०० रुपये, असा दर मिळाला. भोपळ्याची ५२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल १२० रुपये, असा दर मिळाला. दोडक्याची ४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ४५० रुपये, असा दर मिळाला.
केडगाव मध्ये डाळिंबाची १३६० क्रेट आवक
केडगाव उपबाजारात डाळिंबाच्या आवक व बाजारभावात घट झाली आहे. डाळिंबाची १३६० क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १६० रुपये, असा भाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.