दौंड, ता. ५ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात गव्हाची आवक घटली असून बाजारभावात मात्र प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. केडगाव येथे गव्हाची ४०१ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २६५० रुपये; तर कमाल ३१०१ बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे.
दौंड बाजारात कोथिंबिरीची १४८६० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ०५०० व कमाल १५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. मेथीची २१७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० रुपये, तर कमाल २३०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची १०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० तर कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ५१२ २३०० ३१०१
ज्वारी १०५ २६५० ४०००
बाजरी ३९४ १८५० ३२००
हरभरा ०२२ ४७०० ५५०१
मका ४६६ १५०० २००१
उडीद ०६० ४००० ५६००
तूर ००७ ५५०० ६१००
मूग ०१३ ६००० ८०००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा - २१०, आले - ४०० , गाजर - ३५०, पेरू - १५०, काकडी - ३२०, भोपळा - १५०, कोबी - २००, फ्लॅावर - ३००, टोमॅटो - १५०, हिरवी मिरची - ४००, भेंडी -७१०, कार्ली - ५००, दोडका - ५००, वांगी - ३५०, शिमला मिरची - ६००, गवार - १६०० , घेवडा - ५००, बिट - २००, डाळिंब - ७००, मका कणीस - १००, लिंबू - २५०.
कांद्याची आवक वाढली
केडगाव उपबाजारात कांद्याची तब्बल ११२९२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०२०० रुपये; तर कमाल २२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ५५५२ क्विंटल झाली होती.
भेंडी, काकडी व कारल्याच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात भेंडीची ३८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ७१० रुपये, असा दर मिळाला. काकडीची ५५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ३२० रुपये, असा दर मिळाला. कारल्याची ४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ५०० रुपये, असा दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.