पुणे

केडगावात कांदा २२०० रुपये क्विंटल

CD

दौंड, ता. १९ : केडगाव (ता. दौंड) उपबाजारात कांद्याची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याची ७२०३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २००, तर कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला.
केडगाव येथील उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. तसेच, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे.

दौंड बाजारात कोथिंबिरीच्या १२ हजार ९६० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान १०००, तर कमाल २५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीच्या सहा हजार ८५० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान १०००, तर कमाल २४०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूच्या ४७० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान १०००, तर कमाल २२०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीच्या २१० जुड्यांजी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०००, तर कमाल १३०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक (क्विंटल) किमान रु कमाल रु
गहू ६५१ २३०० ३१०१
ज्वारी २१९ २५०० ४५५१
बाजरी ४८५ १८०० ३२००
हरभरा ०२२ ४६०० ५५५१
मका ५०९ १५५० १८३१
उडीद ०४६ ३५०० ५२९०
मूग ०१९ ७५०० ८४४०

दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति १० किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा- २१०, आले - ४००, गाजर- ४००, पेरू- १२०, काकडी- ४३०, भोपळा- ३१०, कोबी- ३००, फ्लॅावर- ३००, टोमॅटो- ४३५, हिरवी मिरची- ४००, भेंडी- ७५०, कारली- ७००, दोडका- ७००, वांगी- ७५०, शिमला मिरची- ६५०, गवार- १५००, घेवडा- ६००, बिट- २००, डाळिंब- १४५०, मका कणीस- १५०, लिंबू- २००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT