दौड प्रफुल्ल भंडारी : सकाळ वृत्तसेवा
दौड, ता. २० : दौंड तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा आणि लसीकरणासंबंधी फार तक्रारी नाहीत. मात्र, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचार्ऱ्यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध नाहीत. तालुक्यात आवश्यक तेथे नवीन सुसज्ज दवाखाने बांधणे आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध उपलब्ध नाही. त्यामुळे पशुपालकांच्या पशुधनांसाठी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी असंख्य अडथळ्यांना सामना करावा लागत आहे.
तालुक्यात २७ पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी काही ठिकाणच्या दवाखान्यांचे बांधकाम जीर्ण झाले आहे. पशुसंवर्धन विभाग हा प्राधान्यक्रमात नसल्याने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना दौंड पंचायत समितीत अतिशय छोटा कक्ष देण्यात आला असून तेथून त्यांना कारभार पाहावा लागत आहे.
तालुक्यात दौंड, केडगाव, राहू, बोरीभडक, वडगाव बांडे, नानगाव, खडकी, देलवडी, सोनवडी, कुरकुंभ, गिरीम, बोरीबेल, कानगाव, यवत, पाटस, वरवंड, मलठण, देऊळगाव राजे, रावणगाव, राजेगाव, गलांडवाडी, वासुंदे, पडवी, खामगाव, दहिटणे, खोर व पारगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. देलवाडी, कुरकुंभ व नानगाव यांना स्वतःची इमारत नाही. या दवाखान्यांमध्ये औषधांचा साठा पुरेसा आहे. दौंड शहरातील दवाखान्यात श्वानांवर उपचार केले जातात तरी बहुतांश श्वानपालक उपचारांसाठी बारामती येथील खासगी दवाखान्याला प्राधान्य देतात.
पुणे जिल्हा परिषदेने केडगाव येथे जिल्ह्यातील पहिला बोलका पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करीत सर्व प्रकारच्या पशुंसाठी सर्वोत्तम उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच धर्तीवर तालुक्यातील सर्व दवाखाने बोलके आणि सुसज्ज करण्याची आवश्यकता आहे. तालुक्यात तीन फिरते पशुवैद्यकीय पथके आहेत.
स्मार्टअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण
मल्टी पर्पज आर्टिफिशियल इनसेमिनेशव टेक्निशियन (मैत्री) प्रकल्पांतर्गत भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन (बायफ) या संस्थेत तंत्रज्ञ यांना कृत्रिम रेतनसंबंधी प्रशिक्षण दिले जाते. गोखलेनगर (पुणे) स्थित राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेत पशुसखी यांना पशुधन व्यवस्थापनांतर्गत जनावरांना हाताळणे, लसीकरण, संतुलित आहार आणि शेळीपालन संबंधी प्रशिक्षण दिले जात असल्याने तालुक्यातील पशुसखींना तेथे पाठविले जाते. राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत शेतकरी गटांना पशुसंवर्धन विषयक मूल्य साखळी विकसित करण्यासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे.
यांची आहे गरज
- क्ष - किरण यंत्रे, सोनोग्राफी यंत्रणा
- तालुक्यात मिनी पॅाली क्लिनिक
- सुसज्ज प्रयोगशाळा
- अधिकारी व कर्मचारी करिता निवासस्थाने
- महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह
- दवाखान्यांना संरक्षक भिंत, कुंपण व पेव्हिंग ब्लॅाक
- स्वतंत्र व सुसज्ज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय
तालुक्यातील रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी...........३
पशुधन पर्यवेक्षक...........२
व्रणोपचारक...........२
परिचर...........१२
पशुपैदास
कृत्रिम रेतन केंद्रांची संख्या : २७
ऑक्टोबर अखेर ८९९० कृत्रिम रेतन झालेली आहेत.
वंधत्व निर्मूलन मोहिमा ६३ गावांत झाल्या आहेत.
गर्भ तपासणी, बछड्यांचे जन्म दर, वंधत्व दर
ऑक्टोबर अखेर गर्भ तपासणी.............१३०१८
जन्मलेली वासरे.............३८२७
वंधत्व तपासणी.............४२४६
पशुधन आरोग्य व रोग नियंत्रण (ऑक्टोबरअखेर)
तालुक्यातील एकूण लसीकरण.................३,५३, १७३
लाळ्या - खुरकूत प्रतिबंध.............१,०५, ९५६
शेळी - मेंढींसाठी : पेस्टी - डेस पेटीटस रूमीनन्टस (पीपीआर) लस .............७५७१८
चारा व वैरण विकास
ऑक्टोबरअखेर ४४१५ किलो मका बियाणाचे वाटप
तालुक्यातील पशुधन
गाय वर्ग...........८३४२६
म्हैस वर्ग...........२७८३२
शेळ्या...........६९६०५
मेंढ्या...........६९८५०
कोंबड्या...........१११७९७६
वार्षिक कृती आराखडा तयार असून २७ पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत त्याची अंमलबजावणी सुरू आहे. निधी वापराचा दर शंभर टक्के आहे. पशुसंवर्धन व विकास करिता गोशाळा सहायता योजना, मेंढी-शेळी विकास योजना, दुग्ध व्यवसाय स्वयंरोजगार योजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय पशुधन मोहीम, पशुसंवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम व योजना त्याच आर्थिक वर्षात राबविल्या जातात व निधी खर्च केला जातो.
- डॅा. विकास घोडे, दौंड तालुका पशुवैद्यकीय अधिकारी
04219
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.