पुणे

दौंडमधील बाजारात ज्वारीचा भाव वधारला

CD

दौंड, ता. ७ : दौंड तालुक्यात ज्वारीची आवक वाढली आहे. बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल ६५० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची १२९ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान २०५० तर कमाल ५१५० रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव व पाटस येथील उपबाजारांत भुसार मालाची आवक कमी झाली आहे. यवतमध्येही भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.

दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १०८६९ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १२०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ७९७५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपूची २०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल ६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.

तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक किमान कमाल
(क्विंटल) (रु.) (रु.)
गहू ५०४ २३०० ३०५०
ज्वारी १२९ २०५० ५१५०
बाजरी १६२ २०५१ ३२००
उडीद ००५ ४८०० ६२००
हरभरा ०२३ ४८०० ५५१२
तूर ०६१ ६००० ७८१०
मका ०६५ १७०० १९६१


बाजारभाव पुढीलप्रमाणे ( प्रतिदहा किलोसाठीचे कमाल भाव) : बटाटा-१४०, आले-५००, गाजर-२५०, पेरू-२००, काकडी-३५०, भोपळा-२००, कोबी-१००, फ्लॅावर-२२०, टोमॅटो-१५०, हिरवी मिरची-१०००, भेंडी-६००, कार्ली-८००, शिमला मिरची-४००, वटाणा-३२०, घेवडा-२००, बिट-२००.

भोपळा, मिरची व कारल्याच्या भावात वाढ
दौंड मुख्य बाजारात भोपळ्याची १२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल २०० रुपये असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची २६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ३०० तर कमाल १००० रूपये, असा दर मिळाला. कारल्याची ०७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५०० तर कमाल ८०० रुपये, असा दर मिळाला.

केडगावात कांद्याची आवक वाढली
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली आहे. बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तीनशे रुपयांची घट झाली आहे. कांद्याची १४६१५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT