दौंड, ता. १० : लातूर-मुंबई एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांचे मोबाईल संच चोरीला गेले. प्रवासादरम्यान मोबाईल संच चार्जिंगकरिता लावलेले असताना या चोरीच्या घटना घडल्या. लातूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसने १ फेब्रुवारीला लातूर ते नवी मुंबई असा प्रवास करणारे बांधकाम कंत्राटदार तुषार हनुमंत तिरूके (वय २२, रा. उलवे, नवी मुंबई) यांचा मोबाईल दौंड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी चोरीस गेला. या मोबाइलचे मूल्य २४ हजार रूपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर, ५ फेब्रुवारीला परिचारिका असणाऱ्या लता महादेव चव्हाण (रा. वाकोला, मुंबई) या विशाखापट्टणम-मुंबई एक्सप्रेसने कलबुर्गी ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान दौंड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांचा १९ हजार रूपये मूल्य असलेला मोबाईल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात याप्रकरणी दाखल दोन स्वतंत्र फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.