पुणे

दौंड बाजारात बाजरी ३३०० रुपये क्विंटल

CD

दौंड, ता. ११ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात बाजरीची आवक वाढली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीची २२५ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान २०००, तर कमाल ३३०० रुपये क्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात बाजरीची १६२ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २०५१, तर कमाल ३२०० रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १० हजार ८३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५००, तर कमाल १३०० रुपये जुडी, मेथीची ५ हजार ७३३ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २००, तर कमाल १००० रुपये, शेपूची १७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ७००, तर कमाल ८०० रुपये, कांदापातीची ६५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५००, तर कमाल ७०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.

तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ४६९ २४०० २९५०
ज्वारी ६० २००० ४४००
बाजरी २२५ २००० ३३००
उडीद ५ ४८०० ६२००
हरभरा ३७ ४५०० ५३००
तूर ८४ ६४०० ७९००
मका १२२ १६५० १८००

बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल भाव) : बटाटा- १४०, आले - ६००, गाजर- २५०, पेरू- २५०, काकडी- ३००, भोपळा- २००, कोबी- १६०, फ्लॅावर- ३००, टोमॅटो- १६५, हिरवी मिरची- ११००, भेंडी- ६००, कारली- ६००, दोडका- ६००, वांगी- ६००, शिमला मिरची- ५००, वटाणा- ३६०, घेवडा- ३१०, बिट- १५०, लिंबू- ४००, मका कणीस- १७० रुपये.

टोमॅटो, कोबी व मिरचीच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची १७५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५०, तर कमाल १६५ रुपये, असा भाव मिळाला. कोबीची ७१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५०, तर कमाल १६० रुपये, असा भाव मिळाला. हिरव्या मिरचीची २९ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ३००, तर कमाल ११०० रुपये, असा दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT