पुणे

महिलांनी आदर्श विचारांचा वारसा रुजविणे गरजेचे : पवार

CD

डोर्लेवाडी, ता. २८ : ‘‘महिला सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने सक्षम असतील तर त्या स्वतःपासून स्वतःच्या कुटुंबाला नक्कीच सक्षम बनवू शकतात. आपल्या आयुष्यात आपण जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांना आदर्श मानत असतो, पण त्यांच्या विचारांचा वारसा आपण आत्मसात करत नाही. महिलांनी केवळ आदर्श नाही तर त्यांचे आदर्श विचारही कुटुंबासह समाजात रुजविणे महत्त्वाचे आहे.’’ असे प्रतिपादन शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी केले.
मळद (ता. बारामती) येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सुनंदा पवार बोलत होत्या. या वेळी ग्रामपंचायत सदस्या सारिका पिसाळ, आशा लोंढे, सुनीता सातव, सुनीता चव्हाण, मराठा सेवा संघाच्या शहर अध्यक्षा अर्चना सातव, आशा उबाळे, गौरी गावडे, रेश्मा गावडे, प्रियांका गावडे, तेजस्विनी देंडे, मानसी भोसले उपस्थित होत्या.
पवार म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे मी शारदानगर शैक्षणिक संकुलात काम करत असताना मुलींचा कायम आदर करून तिला स्व-ची जाणीव करून देण्याचे काम करत आहे. आजची युवती देशाचे उद्याचे भविष्य आहे. प्रत्येक आईने मुलांसाठी आदर्श बनले पाहिजे, त्यांच्या भविष्याची काळजी म्हणून त्यांना शैक्षणिक सक्षम बनविले पाहिजे, सामाजिक जबाबदारीची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. येणारा काळ आपल्या मुलांसाठी स्पर्धेचा आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून मुलांना संस्कारांसोबत आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षम बनवा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोणारमध्ये शुक्रवारपासून 'खगोल दर्शन महोत्सवा'चे आयोजन; 'डार्क स्काय' उपक्रमातून अवकाशाचे रहस्य उलगडणार

Pune Crime News: तोतया पोलिसांकडून दोन ज्येष्ठांचे दागिने लंपास

Parola News : भंगार खरेदीतून अनेक युवकांना रोजगार; पारोळा शहरात खरेदी व्यवहारातून हजारो रुपयांची उलाढाल

Degloor Drug License: देगलूरमध्ये औषध विक्रीत गंभीर अनियमितता; डी. अँड जी फार्माचे दोन्ही परवाने रद्द, २१ एप्रिलपासून खरेदी-विक्रीस संपूर्ण बंदी

Pune PMP Bus Theft: पीएमपी बसमध्ये महिलांचे दागिने लंपास; दोन लाखांचा ऐवज चोरीस

SCROLL FOR NEXT