पुणे

डोर्लेवाडीत जिजाऊ, सावित्रीबाई जयंतीनिमित्त कार्यक्रम

CD

डोर्लेवाडी, ता. २१ : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त गावात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
येथील समस्थ ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कथाकथन, ठसका पैठणीचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांचा, तसेच विविध संस्थांवर निवड झालेल्या पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ समाजसेविका विजया पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या.
यावेळी बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, नगरसेविका मंगल जगताप, शर्मिला ढवाण, ॲड. अश्विनी सातव, आरती शेंडगे, दीपाली बोबडे, सारिका वाघमारे, सरपंच सुप्रिया नाळे, डॉ. प्रतिभा नेवसे, सोनाली नवले आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी कथाकथनकार प्रा. जयवंत आवटे यांनी ग्रामीण विनोदी ढंगातून प्रबोधन करीत पैठणीचा कार्यक्रम रंगविला. यामध्ये सुनीता केवटे, राणी केवटे, मंदाकिनी नाळे, अर्चना नाळे, आरती साळुंखे, माधुरी पवार, स्वाती भोपळे, अर्चना क्षीरसागर, चित्रा भोसले आदींनी पारितोषिके मिळविली. तसेच, अनेक महिलांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.
यावेळी अध्यात्म, शैक्षणिक, वैद्यकीय व उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जयश्री दत्तात्रेय नवले व कुटुंबीय व गावातील पहिल्या महिला पी.एच.डी हा बहुमान मिळवलेल्या डॉ. स्वाती विजय नवले आणि उच्च शिक्षित नवले कुटुंबीयांला सिंधूताई सपकाळ जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, डॉ. सेजल अनिल नवले, दिव्या गणेश नाळे, डॉ. संकेत शहा यांच्यासह बारामती नगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा व नगरसेविका यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज काळोखे यांनी केले. संदीप मोरे यांनी आभार मानले.

01190

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT