पुणे

टोमॅटोचा उत्पादन खर्चही होईना वसूल

CD

देऊळगाव राजे, ता.६ : टोमॅटोच्या बाजारभावात घसरण झाली आहे. क्रेटला सुमारे १५० ते ३५० रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत
नाही. यामुळे दौंड तालुक्यातील उत्पादकांची चिंता वाढली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी साधारणतहा जून, जुलै महिन्यात टोमॅटोच्या रोपाची लागवड केली आहे. एक एकरासाठी लागवड ते उत्पादकापर्यंत एकरी १,२५००० हजार ते १, ५०,००० पर्यंत खर्च येत आहे. गेल्या महिनाभरापासून टोमॅटोच्या बाजारभावात घसरण होत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना वाहतूक खर्च पदर भरावा लागला आहे. सध्या नारायणगाव येथे टोमॅटोला १५० ते ३५० रुपयापर्यंत मालाच्या प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत आहे.

बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तालुक्यातील बोरीबेल येथे सुमारे जून व जुलैमध्ये ३०० एकरावर टोमॅटोची लागवड झाली आहे. सध्या २०० एकर टोमॅटोची तोडणी सुरू आहे. उत्पादनासाठी औषधे, रासायनिक खते, साहित्य, वाहतूक महाग आहे. तोडणीसाठी मजुरीही द्यावी लागत आहे. समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.


यंदा पाऊस अधिक पडल्यामुळे टोमॅटोवर रोगराई वाढली आहे. टोमॅटोच्या उत्पादनासाठी सुमारे एकरी १,२५,००० हजारापर्यंत खर्च येत आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालेला दिसत आहे.
- दत्तात्रेय पाचपुते, टोमॅटो उत्पादक शेतकरी बोरीबेल, ता.दौंड


शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी
अति पावसामुळे तालुक्यात सध्या खरीप हंगामातील बाजरी, कपाशी, कांदा, मका, सोयाबीन या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे तालुक्यातील टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे टोमॅटो पिकाचेही पंचनामे करण्याची मागणी बोरीबेल येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.


00654

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT