पुणे

फुलझाडांच्या वाढीसाठी खरपुडीतील शेतांमध्ये बल्ब

CD

दावडी, ता. १९ ः वाढती थंडी, अपुरा सूर्यप्रकाश व हवामान बदलामुळे फुलझाडांचा बहर कमी होणे, बहाराचा काळ बदलणे अशा प्रकारचे परिणाम त्यांवर दिसत आहेत. यावर उपाय म्हणून खरपुडी बुद्रुक (ता. खेड) येथील शेतकरी झाडांना प्रकाशासाठी शेतात विद्युत बल्ब लावत आहेत.
फुलझाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. हिवाळ्यामध्ये लवकर दिवस मावळतो त्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. या झाडांची उंची वाढत नाही व लगेच कळी पकडली जाते. या कारणांमुळे फुले कमी येतात. यासाठी संपूर्ण शेतामध्ये विद्युत बल्ब बसवण्यात येत आहेत. दिवस मावळताच हे बल्ब चालू करावे लागतात जेणेकरून फुलझाडांना पुरेसा प्रकाश मिळून झाडांची योग्य वाढ होते.
‘‘हवामानामध्ये बदल झाला की ढगाळ वातावणामुळे या झाडांवर किड, मवा असे रोग येतात. यावर औषध फवारणी करावी लागते व झाडाच्या वाढीसाठी ४० ते ४५ दिवस रोज दिवस मावळला की बल्ब लावावे लागतात. संक्रातीनंतर या बल्बची गरज नसते कारण तेव्हा दिवस मोठा होत जातो,’’ अशी माहिती खरपुडी मांडवळा येथील शेतकरी निखिल गायकवाड व दुर्गादास पडवळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT