पुणे

प्रा. संपत ब्रम्हांडे यांना इतिहास विषयातील पीएचडी

CD

घोडेगाव, ता. १६ ः ढाकाळे (ता. आंबेगाव) येथील प्रा. संपत मारुती ब्रह्मांडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इतिहास विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘‘पुणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक इतिहास : एक विश्लेषण’’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. प्रा. ब्रह्मांडे यांना पुण्यातील सरस्वती मंदिर रात्र महाविद्‍यालयाचे डॉ. दिपक वेडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर, आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, कासेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) चे प्राचार्य डॉ. एस. एम. मगदूम आणि डॉ. बी. के. माने यांचेही सहकार्य केले होते.
प्रा. ब्रह्मांडे हे सांगली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी ही पदवी प्राप्त केल्याबद्दल किसान सभा आंबेगाव तालुका समितीने त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, रामदास लोहकरे, कृष्णा वडेकर, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे यांनी प्रा. ब्रह्मांडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

Horoscope Prediction : पुढच्या 72 तासात 'या' 4 राशीच्या लोकांचं नशीब बदलणार; पाहा यात तुमची रास आहे का?

Ashes, 1st Test: 0,0,0...इंग्लंड-ऑस्ट्रेलियन ओपनर आधी गंडले, मग घोंगावलं ट्रॅव्हिस हेडचं वादळ! कांगारुंनी दोनच दिवसात जिंकली मॅच

एकदम कातिल! रेखाच्या एव्हरग्रीन गाण्यावर रिंकू राजगुरूचा जबरदस्त डान्स; दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ

Movie Review : असंभव - मानवी भावभावनांची रहस्यमय गुंफण

SCROLL FOR NEXT