पुणे

घोडेगावात प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

CD

घोडेगाव, ता. १८ : येथील पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते झाला.
घोडेगाव (ता आंबेगाव) येथील पंचायत समिती इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाकडून १३ कोटी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे पाटील, पांडुरंग पवार, माजी सभापती कैलासबुवा काळे, संजय गवारी, आनंदराव शिंदे, उषा कानडे, ताराचंद कराळे, गौतम खरात, तुलसी भोर, सरपंच अश्विनी तिटकारे, सोमनाथ काळे आदी उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी प्रास्ताविकात नवीन इमारतीच्या कामासंदर्भात माहिती दिली. ‘‘आंबेगाव तालुक्यात बिबट्यांच्या वावरामुळे मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला उंच कंपाउंड बांधावे. जिल्हा तसेच जिल्हा परिषदेची २५ मुले नासामध्ये गेली. जिल्हा परिषदेच्या ५० मुलांना राष्ट्रपतींना भेटता आले याचा अभिमान वाटतो, तसेच क्रीडा स्पर्धांना राखीव निधी अनुदान असावे,’’ अशी अपेक्षा पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

घोडेगावमधील न्यायालयाच्या इमारतीमध्ये बचत गटांचे स्टॉल उभारणार आहे. तसेच भीमाशंकर रस्त्याला लागून असलेल्या पंचायत समितीच्या जागेत भव्य व्यापारी संकुल उभारले जाईल.
- गजानन पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

04473

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : कपिल देव पाकिस्तानवर भडकले! म्हणाले, एका पिढीची तुम्ही वाट लावताय, तुमच्याच खेळाडूंचं नुकसान करताय...

मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ कागच भिरकावणारे सहा खासदार निलंबित, अध्यक्षांची कारवाई

Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुती इतिहास घडवणार- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT