चंद्रकांत घोडेकर : सकाळ वृत्तसेवा
घोडेगाव, ता २० : नारोडी (ता आंबेगाव) जुना दवाखाना पूर्णपणे बंद पडला असून, तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर केला आहे. शासकीय कार्यालयांप्रमाणे पशू चिकित्सालयासाठी सुसज्ज इमारतीची गरज असून, अद्ययावत दवाखाना सुरू व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाला ५० लाख रुपये चा आराखडा तयार करून पाठवला असल्याचे सरपंच मंगल हुले यांनी सांगितले.
नारोडीतील पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे नारोडी, चास, ठाकरवाडी, कडेवाडी इत्यादी गावांमध्ये सेवा दिली जाते. सदर गावांमध्ये अंदाजे २१०० पशुधन असून यामध्ये गोवर्ग, म्हैसवर्ग तसेच शेळी व मेंढ्यांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक डाके यांच्याकडे नारोडी येथे पूर्ण वेळ दवाखान्याचा कार्यभार व शिनोली येथे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नारोडी येथे नरेंद्र जनार्दन कोंढवळे हे परिचर पदावर कार्यरत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेमुळे आता नारोडी येथे पशू चिकित्सालय प्रस्तावित आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन............१६०
वंध्यत्व निर्मूलन............१५०
लसीकरण
लाळ्या खुरकूत............२७००
लंपी............१३००
घटसर्प............६००
फऱ्या............१००
आंत्रविषार............१३००
वैरण बियाणे वितरण
मका १०० किलो
एकूण वार्षिक चारा उत्पादन (टनांत)
हिरवा ............१२०००
वाळलेला ............२०००
परिसरात आढळणारे प्रमुख पशू रोग
चयापचयाचे आजार
मस्टायटिस
प्रोटोझोअल
काही पशुपालकांमध्ये लसीकरणाविषयी उदासीनता दिसून येते. परंतु सदर आजार उद्भवल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी शासनातर्फे दिले जाणारे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. अभिषेक डाके, पशुवैद्यकीय अधिकारी
नारोडी परिसरातील गावे ही पूर्णपणे बागायती आहेत. येथे पशुधनाची संख्या मोठी असल्यामुळे प्रत्येक दिवशी जवळ जवळ एक हजार लिटरचे दूध संकलन होत आहे. आजारी जनावरांना तातडीने उपचार होण्यासाठी येथे अद्ययावत तालुका व्हावा यासाठी ५० लाख रुपयांचा आराखडा शास्त्राला सादर केला आहे. राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा आराखडा लवकरात लवकर मंजूर करून अशा प्रकारचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.
- मंगल हुले, सरपंच, नारोडी (ता. आंबेगाव)
04483