पुणे

आदिवासी मुलांच्या आहारात दररोज स्ट्रॉबेरी

CD

घोडेगाव, ता. ५ : आदिवासी आश्रम शाळेत शिकत असलेल्या मुलांना स्ट्रॉबेरी देण्यासाठी घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी विकास विभागाने विकत घेऊन आश्रम शाळेतील मुलांना दररोजच्या आहारात देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. स्ट्रॉबेरी खरेदी करून ती आश्रमशाळेतील मुलांपर्यंत पोहोचवली जात आहे.

आदिवासी विकास विभाग व कृषी विभाग यांनी अर्थसंकल्पीय योजनेतून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन संपूर्ण सेंद्रिय स्ट्रॉबेरी पिकवली आहे. प्रकल्प अधिकारी देसाई यांनी शेतकऱ्यांनी पिकवलेली ही स्ट्रॉबेरी १५५ रुपये किलोने खरेदी करून आश्रमशाळेतील मुलांच्या खायला देण्याची योजना सुरू केली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी घोडेगाव (ता आंबेगाव) येथे सुरू असलेले मध्यवर्ती स्वयंपाकगृहात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी आणून द्यावी व या ठिकाणी वजन करून पैसे घेऊन जावेत, असे आवाहन प्रकल्पाधिकारी देसाई यांनी केले आहे. पहिल्या दिवशी उगलेवाडी येथील आठ शेतकऱ्यांनी अंदाजे ५० किलो स्ट्रॉबेरी आणून दिली. या स्ट्रॉबेरी खरेदी प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनूल कोतवाल, संदेश पाटील, समाजसेविका जनाबाई उगले व ग्रामस्थ उपस्थित होते.


आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी मुलांनाच खायला जात असल्याचा मनापासून आनंद होत आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन योजना सुरू करायला लावली याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे.
- प्रदीप देसाई, प्रकल्पाधिकारी, घोडेगाव (ता. आंबेगाव)


कोणतेही औषध खत न मारता संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवली स्ट्रॉबेरी आमच्याच मुलांना खायला मिळत आहे. याचे खूप समाधान वाटते. प्रकल्प अधिकारी यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली योजना खऱ्या अर्थाने आदिवासींच्या कल्याणासाठी राबवली असल्याचे दिसून येत आहे.
- जनाबाई उगले


04711

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT