पुणे

गुळुंचे, कर्नलवाडी हद्दीत पुन्हा सोडले रसायन

CD

गुळुंचे, ता. २६ ः गुळुंचे, कर्नलवाडी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीत रसायनमिश्रित द्रव सोडताना स्थानिकांनी टँकर चालकासह एकाला रंगेहात पकडून बुधवारी (ता. २४) पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांनतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून भारतीय वन अधिनियमाप्रमाणे दोन जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र, तरीही अवघ्या काही तासात पुन्हा त्याच ठिकाणी रसायन सोडण्यात आल्याचे निदर्शनाला आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याप्रकरणात आर्थिक व राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.
गुळुंचे व कर्नलवाडी हद्दीत, तसेच बारामती तालुक्याच्या गावांच्या हद्दीत वनक्षेत्र अनेक एकरात पसरले आहे. माळरानाच्या उताराला अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी असून, जलस्त्रोत आहेत. वनक्षेत्रात अनेक प्राण्यांचा अधिवास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुळुंचे, कर्नलवाडी, गडदरवाडी (ता. बारामती) व बारामती तालुक्याच्या हद्दीत अशा प्रकारची रसायने, कचरा, मळी सोडण्याचे प्रकार सुरू आहेत. निर्मनुष्य जागी रात्रीच्या वेळी आजवर या घटना घडल्या आहेत. मात्र, नागरिकांच्या सजगतेने प्रथमच एका टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात स्थानिकांना यश आले होते.
याबाबत दोन्ही गावातील नागरिकांनी जेजुरी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. कर्नलवाडी येथील गट क्र. ५६ मध्ये नुकतेच हे रसायन सोडण्यात आले आहे. तसेच यापूर्वी गट क्र ५०, ५४, ४८, ५८, ५७ आणि गुळुंचे गावातील गट क्र. ११६, ११९ मध्ये अशी रसायने, मळी सोडण्यात आल्याचे पोलिस पाटील दिनेश खोमणे यांनी सांगितले.
याबाबत गुळुंचेचे पोलिस पाटील दीपक जाधव म्हणाले, ‘‘गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात असे प्रकार सुरू आहेत. मात्र, प्रदूषण करणारे गुपचूप कारभार करत होते. रसायन मिश्रित पाण्यामुळे पाळीव जनावरे व शेळ्या मेंढ्या मृत्यूमुखी पडत होत्या.’’
दरम्यान, भारत बेंझ कंपनीच्या टँकरने सोडण्यात आलेल्या रसायनाची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती फौजदार सर्जेराव पुजारी यांनी दिली.

02061, 02062

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Red Alert : राज्यातील बावीस जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Rohit Pawar : ‘’मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया बघता महाराष्ट्राला...’’ ; रोहित पवारांनी साधला निशाणा!

Finance Ministry New Address: अर्थ मंत्रालयाला नवे घर मिळणार, नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडणार, 'या' भवनात नवा प्रवास सुरू करणार

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस धोक्याचे, पावसाचा जोर आणखी वाढणार; मान्सूनचा राज्यातील परतीचा प्रवास लांबला

IND vs SL Live: अभिषेक शर्माचा विक्रमांचा पाऊस! तिलक वर्मा, संजू सॅमसनची साथ; भारताच्या तगड्या धावा

SCROLL FOR NEXT