पुणे

अंजिर, सीताफळ बागा मोजतायेत शेवटच्या घटका

CD

सासवड शहर, ता. ४ : पुरंदर तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने विहिरी, नाले, ओढे, तळी कोरडी पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पाण्या अभावी बहुतेक ठिकाणी पिके करपली आहेत. पशुधन, अंजीर तसेच सीताफळ बागा अंतिम घटका मोजत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

बिकट परिस्थितीत जगायचं कसं असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे प्रशासनाकडे टँकरची मागणी जोर धरत आहे. सध्या तालुक्यातील ३२ गावे आणि २३२ वाड्यावस्त्यावरील ६६ हजार ५०२ नागरिकांना ५० टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.

टँकर सुरू असलेल्या गावाचे नावे, वाड्यावस्त्यांची संख्या, लोकसंख्या, खेपांची संख्या याप्रमाणे : ''सोनोरी आणि १२ वाड्यावस्त्यावरील २६५० नागरिकांना ८ खेपा, वाल्हे येथील १३ वाड्या वस्त्यांवरील २०२३ नागरिकांना ९ खेपा, वागदरवाडी आणि ७ वाड्यावस्त्यांवरील खेपा, रिसे आणि ३ वाड्या वरील ९३१ नागरिकांना ३ खेपा, पिसे आणि ३ वाड्यांवरील ९१३ नागरिकांना ३ खेपा, राजुरी आणि १४ वाड्या वस्त्यावरील ४३१४ नागरिकांना ४ खेपा, साकुर्डेच्या १० वाड्या वस्त्यावरील १२८२ नागरिकांना ३ खेपा, जवळार्जुन आणि ८ वाड्या वस्त्यावरील २६९६ नागरिकांना १२ खेपा, दौंडज आणि ३ वस्त्यावरील १७०७ नागरिकांना ६ खेपा, दिवे आणि १२ वाड्या वस्त्यावरील १११६१ नागरिकांना २३ खेपा, झेंडेवाडी आणि ६ वाड्या वस्त्यावरील २८०० नागरिकांना ८ खेपा, जेजुरी ग्रामीण आणि ६ वाड्या वस्त्यावरील २७२० नागरिकांना ६ खेपा, पांडेश्वरच्या १० वाड्यावस्त्या वरील १४८४ नागरिकांना ५ खेपा, खळदच्या ६ वाड्या वस्त्यावरील ६५० नागरिकांना ४ खेपा, बोपगाव येथील ११ वाड्या वस्त्यावरील २०१४ नागरिकांना ७ खेपा. दरम्यान नायगाव ते पुरपोखर या गावांत टँकर सुरू आहेत.

पुरंदर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या गावांना टँकर हवे असतील त्यांनी प्रस्ताव द्यावेत. तसेच काही समाजसेवी आणि खासगी संस्था पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवू इच्छित असतील तर त्यांनी पंचायत समिती किंवा प्रांताधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून नागरिकांना मदत करावी.
- डॉ. अमिता पवार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती.


बागा जळताना पाहून काळीज तुटते
दुष्काळामुळे अंजीर बागा जळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. १०/१० वर्षे शेतकऱ्यांनी बागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून जगवल्या आहेत. पण सध्या दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह असल्यामुळे या बागा डोळ्यासमोर जळताना पाहून काळीज तुटते आहे. अंजिराच्या आता खरा मोसम असून, पाण्याअभावी बागा जळाल्यामुळे एकरी दहा-बारा लाख रुपयांचे प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, अशी त अंजीर उत्पादनात पुरस्कार मिळवलेले सोमुर्डीचे शेतकरी बाबा पवार यांनी व्यक्त केली.

08548

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

Acute Encephalitis Syndrome: उपराजधानीला मेंदूज्वराचा धोका; शहरात आढळले ८ रुग्ण, मनपाच्या रूग्णालयात उपचाराच्या यंत्रणेचा अभाव

Pune Navratra Mahotsav : ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’मध्ये कला, संस्कृती, गायनाचा संगम; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्‍घाटन

SIP Tips: SIP मध्ये रोज 100 रुपये की महिन्याला 3000 रुपये गुंतवणूक करावी? कुठे होतो जास्त फायदा?

SCROLL FOR NEXT