पुणे

सोमुर्डी येथील मारहाणीतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

CD

सासवड शहर, ता. २३ : सोमुर्डी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (ता. १९) जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात मारहाण झालेल्या जखमी जय पवार याचा रविवारी (ता. २२) सकाळी पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह सासवड पोलिस ठाण्यात आणला. आरोपींना अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नातेवाइकांनी नेला.
सोमुर्डी येथील जय पवार व संशयित आरोपी अष्टर मॅक्झिन शिंदे, सचिन मॅक्झिन शिंदे (रा. बोपखेल, पुणे), कोकिण पवार, विकेश पवार (रा. खडकी, श्रुती मोहल्ला), अनुराग भोसले व दोन अनोळखी व्यक्ती यांच्यात एका जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. त्यांनी गुरुवारी सोमुर्डीत येऊन जय पवार यांच्यावर हल्ला केला. त्यात जखमी झाल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जय पवार यांच्या नातेवाइकांनी आरोपींना अटक करावी, यासाठी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात घेऊन आणला. आरोपींना अटक करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाइकांनी घेतली. यावेळी सासवड पोलिसांनी नातेवाइकांना आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नातेवाइकांनी मृतदेह शिरूरला नेऊन अंत्यसंस्कार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत... दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती लागू करणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती

Thane News: बाजारपेठेत अतिक्रमण, वरून मराठी भाषेबद्दल गरळ ओकली; मनसैनिकांनी परप्रांतीयाला बेदम चोपलं

Nashik AB Gang चा 'भाई' जेलमधून बाहेर, समर्थकांनी काढली मिरवणूक, पोलिसांनी मग पुरती झिरवली | Video Viral | Sakal News

Satara News: 'सज्‍जनगडावरील मंदिराचे पालटतेय रुपडे': सभागृहाची रंगरंगोटी; महाद्वारानजीक नवीन रेलिंग बसविण्‍याच्‍या कामालाही गती

Latest Marathi News Live Update: कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार

SCROLL FOR NEXT