पुणे

सासवडमधील फार्मा मॉडेल मॅनिया स्पर्धेत श्रुती, हर्षदा यांची बाजी

CD

सासवड शहर, ता. ३० : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मॅनिया स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये एस. जी. आर. एस. कॉलेज ऑफ फार्मसीच्या श्रुती बेंबडे व हर्षदा केवटे यांनी प्रथम, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी पुणेच्या शेख असीला हिने द्वितीय, तर पी. ई. एस. मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी निगडीच्या मृन्मय कोठे व तन्मय जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्‍घाटन आणि मूल्यमापन करण्यासाठी डॉ. संजीव दिगंबर टांकसाळे, संचालक, पियुष न्यूट्रिफार्मा ओपीसी प्रा. लि. तसेच पलक अग्रवाल, सरव्यवस्थापक बायोप्रोसेस डिव्हिजन, अजॉय बायोटेक (इंडिया) लि., पुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव मॉडेल्सचे परीक्षण करून त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला बाळासाहेब भिंताडे, कार्यकारिणी सदस्य, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, पुरंदर यांनी विशेष उपस्थिती लावली. हा उपक्रम प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. समन्वयाची जबाबदारी डॉ. वैभव शिळीमकर, प्रा. हनुमंत पाटील तसेच पॉलिटेक्निक विभागातील प्रा. सागर भिसे यांनी सांभाळली.


11781

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरला! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT