सासवड शहर, ता. २१ : पुरंदर तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांना तत्काळ पिजर्यांत कैद करण्यासाठी जेजुरी येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज यांच्यामार्फत कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (CSR) निधीमधून एकूण ५ बिबट पिंजरे सासवड वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात येणार आहे, त्यातील एक पिंजरा गुरुवारी (ता. २०) वनविभागास सुपूर्त करण्यात आला.
एक पिंजरा भेट देण्यासाठी उपवनसंरक्षक पुणे, महादेव मोहिते, व सहाय्यक वनसंरक्षक, भोर शीतल राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सागर ढोले वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड, गणेश पवार, वनपाल सासवड, राहुल रासकर, वनपाल परिंचे, व दीपाली शिंदे, वनपाल जेजुरी व कार्यालयीन कर्मचारी तसेच किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज जेजुरी यांच्यामार्फत प्रकल्प प्रमुख पी. सत्यमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली रेजी के, जब्बार पठाण, प्रवीण पवार, सागर झोपे, सूरज भोईटे हे उपस्थित होते. सासवड वनक्षेत्रातील मांढर, परिंचे, कोडीत बुद्रूक, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, जेजुरी, मांडकी, झेंडेवाडी, नारायणपूर या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे बिबट मानवी वस्तीत येणे, बिबटमार्फत पाळीव प्राणी, भटके कुत्रे यांच्यावर हल्ले होणे तसेच शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना बिबट दिसणे, औद्योगिक क्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचा वावर वाढणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे हा पिंजरा भेट देण्यात आला.
बिबट प्रवण क्षेत्रात वावरताना लहान मुले यांना एकटे सोडू नये तसेच शेतीची कामे करताना शेतामध्ये रात्रीच्यावेळी जाताना समूहात जावे कामे करताना सोबत मोबाइलवर गाणे सुरू ठेवावीत व जोरात बोलत कामे करावीत. तसेच आपली पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवावीत. घराभोवती रात्रभर दिव्यांचा उजेड राहील याची काळजी घ्यावी तसेच घराभोवती भटके कुत्रे येऊ नये याकरिता घराभोवती कचरा, उरलेले अन्न टाकू नये तसेच कोठेही बिबट्याचा वावर आढळल्यास तत्काळ वनविभागास कळवावे.
- एस.एस. ढोले, वन परिक्षेत्र अधिकारी, सासवड
2127
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.