सासवड शहर, ता. २२ : थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. सासवड (ता. पुरंदर) शहरात शुक्रवारी (ता. २१)
दिवसभर हवेत गारवा होता. रात्री साडेदहानंतर हवेत बदल होऊन गारवा वाढला. हवेची येणारी झुळूक शरीराला बोचणारी होती. रात्री उशिरा नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला. यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश होता.