पुणे

पुरंदरमध्ये ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणा

CD

गराडे, ता. ३ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. सामान्य माणसाची कामे करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे. त्या सर्वसामान्य लोकांना बारामती येथील अंत्यविधीच्या दिवशी अजित दादांचे दर्शन झाले नाही. म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यात अस्थिकलश दर्शन रथाचे आयोजन करण्यात आले होते.
आस्करवाडी फाटा (ता. पुरंदर) येथून सकाळी अस्थिकलश दर्शनाला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथात अस्थिकलश ठेवण्यात आला होता. गावागावात महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनी पुष्प वाहत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तर बऱ्याच ठिकाणी ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणा देत रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
चांबळी ( ता. पुरंदर ) येथे माजी आमदार संजय जगताप, जालिंदर कामठे, मिना शेंडकर, शरद कामठे, कविता कामठे, भाऊसाहेब कामठे, मारुती कामठे, रवी कामठे, हिराबाई कामठे, गौरी कुंजीर, मधुकर कामठे, रामभाऊ झेंडे, पोपट शेंडकर, पोपट झेंडे आदी उपस्थित होते.
आस्करवाडी येथून अस्थिकलश दर्शन यात्रेला सुरुवात झाली. तेथून भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, दिवे, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी फाटा, सिंगापूर, वाघापूर, चौफुला, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, माळशिरस, पोंढे, राजुरी, नायगाव, पिसर्वे, पारगाव, बेलसर, शिवरी व खळद येथे समारोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT