पुणे

अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीसाठी सरसावले हात

CD

गुनाट, ता. ५ : वडीलांचे लहानपणीच छत्र हरपलेले...आर्थिक परिस्थिती बेताचीच... उदरनिर्वाहासाठी रोजंदारीशिवाय पर्यायच नाही... अशा विपरीत परिस्थितीत रामदास थोरात या अपघातग्रस्त तरुणाला जीवदान देण्यासाठी गावकरी, मित्र परिवार, डॉक्टर, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते सरसावलेले. या सर्वांचाच उपचारासाठी हातभार लागला. त्यातून या तरुणाला जीवदान मिळाले.
निमोणे (ता. शिरूर) येथील रामदास शितोळे या तरुणाचा १६ जुन रोजी न्हावरे- तळेगाव ढमढेरे रस्त्यावर अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर न्हावरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दिनकर सरोदे यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यास पुढील वैद्यकीय उपचार अत्यावश्यक होते. त्याची ओळख पटत नसल्याने डॉ. सरोदे यांनी निमोणे येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष (अप्पाराव) काळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना तरुणाची ओळख पटताच त्यांनी पुढील उपचारासाठी तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे त्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या. त्यात त्याच्या मेंदूला मार लागल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी पैसे नसतानाही डॉ. अखिलेश राजूरकर यांनी उपचाराला प्राधान्य दिले. परिणामी वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे सदर तरुणाचा जीव वाचला.
दरम्यानच्या काळात रुग्णाची बेताची आर्थिक परिस्थिती पाहता निमोणे‌ ग्रामस्थ व येथील तरुणांनीही आर्थिक मदतीचे आवाहन करत ५० हजार रुपयांचा निधी उभा केला. तर, उपचारासाठी संतोष काळे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून काही मदत होते का म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. येथेही तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तातडीचे सहकार्य केले. भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखांचा मदतनिधी मिळवला. सोळा दिवसांच्या उपचारानंतर संबंधित रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला.‌
ग्रामस्थ, मित्रमंडळी, डॉक्टर, नातेवाईक या सगळ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत जखमी तरुणाच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याबरोबरच आर्थिक मदतीचा हातभार लावला. त्यातून त्यांना संकटातून बाहेर काढत एक सामाजिक आदर्श समाजापुढे उभा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याचा विक्रमी ऊस दर; राज्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला

IND vs AUS 4th T20I: शुभमन गिलची 'जागा' वाचवण्यासाठी संथ खेळी! सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी, ऑस्ट्रेलियाने आवळला फास...

Latest Marathi Live Update News : पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध बांगलादेशी महिला ताब्यात; मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू....

'हा' मराठी अभिनेता उतरला निवडणुकीच्या रिंगणात? लढवणार नगरपालिकेची निवडणूक; पोस्टर शेअर करत दिली हिंट

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

SCROLL FOR NEXT