गुनाट, ता. १९ : निमोणे (ता. शिरूर) येथे वासरावर हल्ला करीत असलेल्या बिबट्यावर ढोरजकर पिता-पुत्राने मोठ्या हिमतीने प्रतिहल्ला करत बिबट्याला हुसकावून लावत त्याची सोडवणूक केली.
बिबट्याने बबनराव ढोरजकर यांच्या जनावरांच्या गोठ्यातील वासरावर गुरुवारी (ता. १८) पहाटे सहा वाजताच हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गोठ्यातील जनावरांनी मोठ्याने हंबरडा फोडला. या आवाजाने जागे झालेल्या बबनराव ढोरजकर व त्यांचे पुत्र बाळासाहेब ढोरजकर यांनी गोठ्यात बिबट्या वासराच्या मानेवर बसून हल्ला करत होता. प्रसंगावधान राखत ढोरजकर यांनी काठी, बॅटरी टॉर्च यांच्या साहाय्याने बिबट्यावर प्रतिहल्ला केला. मात्र, अशा परिस्थितीत बिबट्याने मोठ्याने डरकाळी फोडत आपण सावज सोडणार नसल्याचे संकेत दिले. पाच ते सात मिनिटांच्या या संघर्षात अखेर बिबट्याने माघार घेत पलायन केले. दरम्यान, जखमी वासरावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार केले. मात्र, अन्ननलिका व श्वासनलिकांना या हल्ल्यात खोलवर जखम झाल्याने वासराची प्रकृती चिंताजनक आहे.
दुग्धव्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण
निमोणे येथे दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे, सहाजिकच येथे जनावरांची संख्याही जास्त प्रमाणात आहे. बिबट्याने थेट गोठ्यातील वासरावर हल्ला केल्याने आता दूध उत्पादकांना ही आपल्या जनावरांच्या सुरक्षिततेची काळजी लागली आहे.
पिंजऱ्याकडे बिबट्याचे दुर्लक्ष
बिबट्याच्या दहशतीमुळे निमोणे परिसरात वनविभागाने चार पिंजरे लावले आहेत. मात्र, या चारही पिंजऱ्याकडे बिबट्या न फिरकता तो इतरत्र सावज मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच बिबटे पिंजऱ्यात अडकणार तरी कधी, हा प्रश्न निमोणेकरांना पडला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे जनावरे व माणसे अशा दोघांचे अस्तित्व धोक्यात येत चालले आहे. भयमुक्त जगायचेच कसे? हा दोघांपुढे प्रश्न आहे. नागरिकांना व जनावरांना भयमुक्त जगण्यासाठी शासनाने आता ठोस पावले उचलली पाहिजेत.
-बबनराव ढोरजकर, ग्रामस्थ, निमोणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.