इंदापूर, ता.१२ : सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील पंढरीनाथ विकास सोसायटी या संस्थेच्या कार्यालयात नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
राष्ट्रीय ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी सुधाकर रगतवार व अंकित सारडा यांनी पंढरीनाथ विकास सोसायटी सरडेवाडीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या कामाची पाहणी करून संस्थेच्या कामाकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच तालुक्यातील सहकारी संस्थांच्या संगणकीकरण कामाचे कौतुक केले.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थेच्या संगणकीकरण कामाचीही माहिती घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वामनराव सरडे, संचालक वामनराव देवकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी आनंदराव थोरात, रमेश पोरे, वसुली अधिकारी अमोल अर्जुन, विकास अधिकारी नीलेश घोलप, वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत शहा, संस्थेचे सचिव मुजीब शेख आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.